Uday Samant statement : महायुतीबाबत उदय सामंतांचे मोठे विधान; म्हणाले,'निवडणुकीसाठी प्रत्येक जागेची तयारी करतोय...'

Mahayuti alliance News : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत उदय सामंत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना महायुतीबाबत मोठे विधान केले आहे.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्याची तयारी सर्वच पक्ष करीत आहेत. ही निवडणूक महायुतीमधील पक्ष एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याचा निर्णय अद्याप झाला नाही. त्यातच या निवडणुकीबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत उदय सामंत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना महायुतीबाबत मोठे विधान केले आहे. शिंदे-फडणवीस यांच्यातील युती अभेद्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील तीन पक्षात श्रेयवाद रंगला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत बोलताना उदय सामंत यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील युती अभेद्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, या युतीमध्ये कोणताही श्रेयवाद नसल्याचे सांगत या वादावर त्यांनी पडदा टाकला आहे.

Uday Samant
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका! सांगलीतील युवासेना नेत्यावर पोलिसांची थेट तडीपारची कारवाई; तीन जिल्ह्यात बॅनही

मराठा आरक्षणाबाबत त्यांनी मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आणि ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या पावलांची माहिती त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांना दिली. त्यासोबतच महायुतीमधील तीन पक्ष आगामी काळात होत असलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्रितच लढणार आहेत. याबाबत प्रदेश पातळीवरील बैठकीत ठरले, असल्याचे सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केले.

Uday Samant
BJP Politics : ते संसदेत शो चालवितात! भाजप खासदारांमधील निवडणुकीतील वादाने गाठले टोक

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये तीन पक्ष एकत्रित लढले तर महायुतीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे शिवसेना ही निवडणूक एकत्रित लढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित काही प्रश्नांनाही त्यांनी उत्तर देताना कोणाला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाकडे विचारणा करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

Uday Samant
Narendra Modi Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका हाकेवर मालेगावच्या व्यापाऱ्याने उचलले मोठे पाऊल; ‘या’ गोष्टीची सर्वत्र चर्चा!

त्यासोबतच आगामी काळात शिवसेना महायुतीमध्ये एकत्रित निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आम्ही आतापासूनच निवडणुकीसाठी प्रत्येक जागेची तयारी करत असल्याचे स्पष्ट करीत उदय सामंत यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्या मित्रपक्षाला सूचक इशारा दिला.

Uday Samant
Manoj Jarange Patil On Dhananjay Munde News : 'धनंजय मुंडेंनी मजा करावी, राजकारण करावं, पण मराठ्यांच्या नादाला लागू नये'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com