Kolhapur News : शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूरचे राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. त्यावर आज काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी थेट मागणी करत आमदार राजेश क्षीरसागर यांना हिम्मत दाखवण्याचा सल्ला दिला आहे. व्हायरल व्हिडिओवरून आमदार राजेश क्षीरसागर यांनी खुलासा करण्याचे आव्हान दिले आहे.
कोल्हापुरात आज आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी व्हायरल केला आहे. यावर सतेज पाटील यांनी अत्यंत गंभीर भूमिका मांडली. पाटील म्हणाले, कोल्हापुरात सध्या जो प्रकार घडला आहे, तो अत्यंत गंभीर आहे. जर तो व्हायरल व्हिडिओ खरा असेल, तर संबंधित लोकप्रतिनिधीने त्याची हिंमत दाखवून जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
आणि जर तो व्हिडिओ खोटा किंवा बनावट असेल, तर तो तसा आहे. हे जाहीरपणे समोर येऊन स्पष्ट केले पाहिजे. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या या प्रकारावर मौन बाळगणे योग्य नाही. असेही आमदार सतेज पाटील म्हणाले.
काल रस्त्याचे, फुलांचे पैसे खाल्ले, आता श्रीरामाला तरी सोडा!
सतेज पाटील पुढे म्हणाले, अयोध्या राम मंदिर कथित पैसा चोरी प्रकरणावर बोलताना. भाजपचा थेट नामोल्लेख टाळत त्यांनी सत्ताधारी आणि त्यांच्या विचारसरणीवर तीव्र शब्दांत आसूड ओढले. या लोकांनी कालपर्यंत रस्त्यांच्या कामात पैसे खाल्ले, स्वागताच्या फुलांच्या पैशांवर डल्ला मारला.
आता तर थेट प्रभू श्रीरामालाही सोडले नाही! अयोध्येच्या पवित्र मंदिरातील चोरीचा प्रकार अत्यंत क्लेशदायक आहे. किमान त्या देवाच्या मंदिरात तरी चोऱ्या करायच्या सोडा!" अशा प्रखर आणि तिखट शब्दांत सतेज पाटलांनी विरोधकांचा समाचार घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.