Eknath Shinde Jyoti Waghmare .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra CM: 2029 च्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार...? शिवसेनेच्या खासदाराचा सर्वात मोठा दावा

Mahayuti Political News: महायुतीतील शिवसेना पक्षाच्या नेतेमंडळींकडून सातत्यानं उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्याबाबत दावे केले जातात.भरत गोगावलेंनंतर दुसर्‍याच दिवशी आता खासदार ज्योती वाघमारेंनीही शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

Deepak Kulkarni

Marathwada News: महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षांचा नेता हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटतं. याच भावना तो कधी त्यांच्या वाढदिवसांनिमित्तच्या फ्लेक्स,बॅनर किंवा मिळेल त्या संधीतून त्याच्या भावना सत्तेची सर्व समीकरणं बाजूला ठेवून अगदी बिनधास्तपणे व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबतही हेच अनेकदा घडलेलं पाहायला मिळतं. त्यात महायुतीतील शिवसेना पक्षाच्या नेतेमंडळींकडून सातत्यानं उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्याबाबत दावे केले जातात.भरत गोगावलेंनंतर दुसर्‍याच दिवशी आता खासदार ज्योती वाघमारेंनीही शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

शिवसेना खासदार ज्योती वाघमारेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत,असं सगळ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या शेतकऱ्यांना वाटतं. त्यामुळे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद फळाला येणार आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हेच साकडं आम्ही पंढरीच्या विठुरायाला घालतो आहे. जेव्हा एखादी बहीण आपल्या भावासाठी परमेश्वराकडे साकडं घालते, त्यावेळी त्यात प्रचंड मोठी ताकद असते. त्यामुळे एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री होणार असेही त्या म्हणाल्या.

2029 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात,असा धक्कादायक दावा त्यांनी करतानाच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संपूर्ण राज्यात आमचा एकमेव शिवसेना पक्ष आहे, जो शेतकऱ्यांना मदत करतो आहे. तसेच एकमेव असे नेते आहेत शिंदेसाहेब, ज्यांनी जोपर्यंत शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत नाही, लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार नाही,तोपर्यंत मला आपली दिवाळी गोड वाटणार नसल्याचं म्हटलं असंही वाघमारे म्हणाल्या.

खासदार ज्योती वाघमारे यांनी दुष्काळ कोरडा असो की ओला,संकट अस्मानी असो की सुलतानी एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहे, हाच संदेश देण्यासाठी आपण इथे आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी गेल्यावेळी अतिवृष्टी झाली त्यावेळीही आम्ही मदत घेऊन आलो होतो. आता कोरडा दुष्काळ पडला आहे,तर यंदाही आम्ही मदत करत असल्याचं मतही व्यक्त केलं.

संजय राऊत आणि रोहित पवार आधी तुम्ही शेतकऱ्यांना कमीत कमी 5 रुपयांचा बिस्कीटचा पुडा तरी द्या आणि मग सरकारला शिकवा असा जोरदार खोचक टोलाही खासदार ज्योती वाघमारेंनी यावेळी लगावला. तसेच शेतकऱ्यांना सरकारने दिलेली पाच रुपयांची मदत ही तात्पुरती मदत आहे. भरघोस मदत सरकारकडून मिळणार असल्याचंही म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT