Prakash Abitkar, Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Abitkar : आरोग्य विभागाचा कारभार सांभाळणाऱ्या मंत्र्याची राजकीय दिशा अडचणीची? एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यामुळे 'त्या' चर्चांना ब्रेक!

Shivsena Eknath Shinde Politics : आजवर ज्यांनी ज्यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांची पुढील राजकीय दिशा अडचणीची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना आरोग्य विभागाचे संधी मिळाल्यानंतर त्याची चर्चा अधिक रंगू लागली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 08 Apr : आजवर ज्यांनी ज्यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांची पुढील राजकीय दिशा अडचणीची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना आरोग्य विभागाचे संधी मिळाल्यानंतर त्याची चर्चा अधिक रंगू लागली आहे.

मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे आबिटकर गटाला आणखी नवी ऊर्जा मिळाली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे आबिटकर गटाला बुस्टर डोस मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पालकमंत्री आबिटकरांना (Prakash Abitkar) मंत्रिपद आणि पाठोपाट पालकमंत्रीपदाची लॉटरी लागल्याने आबिटकर गट जिल्ह्यात मजबूत झाला होता. पण एवढ्यावरच न थांबता जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या आभार दौरा मेळाव्याने देखील आबिटकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आलं आहे.

शिवाय जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही हे दिलेले आश्वासन फार महत्त्वाचे ठरले आहे. या सर्व गोष्टीमुळे आरोग्य विभागाचा कारभार सांभाळणाऱ्या आजवर मंत्र्यांच्या 'त्या' चर्चेला मात्र ब्रेक मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रचारा दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात येत 'आबिटकरांना आमदार करा, मी त्यांना नामदार करून पाठवतो’ असा शब्द दिला होता. अखेर त्यांनी तो शब्द पाळला. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आबिटकर यांनी मुद्दामहून आपल्याच मतदारसंघांमध्ये आभार दौऱ्याचा जंगी कार्यक्रमही घेतला.

केवळ जंगी कार्यक्रमच नाही घेतला तर 80 पेक्षा अधिक जेसीबीच्या साह्याने मैत्री शिंदे यांचे फुलाच्या उधळणीने स्वागत केलं. आजवर राधानगरी तालुक्यात झालेल्या इतर सभांपेक्षा ही सभा वेगळे होते. यावेळी जनतेची उपस्थिती पाहून उपमुख्यमंत्री शिंदेही भारावले. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर राधानगरी विधानसभा मतदारसंघाला विकास निधी देण्यासाठी हात आखडता घेणार नाही.

असा शब्द भर स्टेजवर पालकमंत्र्यांना दिला. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतामुळे येथील आबिटकरप्रेमी कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी मिळाली आहे. या मतदारसंघावर पालकमंत्री आबिटकर यांची पकड घट्ट आहेच, पण त्यांची विधानसभेमध्ये असलेली ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT