Deenanath Hospital : दीनानाथ आंदोलन प्रकरण; कुलकर्णी-घाटे वाद दिल्ली दरबारी, 'डॅमेज कंट्रोल'साठी केंद्रीय मंत्र्यांपासून राज्यातील नेत्यांची पळापळ

Deenanath Mangeshkar Hospital controversy : "कुठल्यातरी सोम्या, गोम्या आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. शिवाय डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काहीही संबंध नसताना केलेले मोडतोडीचे व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे."
Medha Kulkarni vs Dheeraj Ghate
Medha Kulkarni vs Dheeraj GhateSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 08 Apr : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यानंतर विविध संघटनांनी आणि पक्षांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केली.

भाजपच्या (BJP) महिला मोर्चाने देखील रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत डॉ. सुश्रुत घैसास यांच्याशी संबंधित असलेल्या रुग्णालयाची तोडफोड केली आणि आता हेच आंदोलन भाजपमधील अंतर्गत कलहाचे कारण बनल्याचं बोललं जात आहे.

कारण या आंदोलनानंतर खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे शहराध्यक्ष घाटे यांनी हा विषय मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांसमोर नाही तर पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मांडायला हवा होता, असं मत व्यक्त केलं आहे. भाजप अंतर्गत सुरू असलेल्या या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या पुण्यातील स्थानिक नेत्यांची तातडीची बैठक आज बोलवण्यात आली आहे.

या बैठकीला शहरातील आमदार, खासदार, मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सुरू असलेल्या वादाच्या मुद्द्यावरती चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत खासदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे आणि मेधा कुलकर्णी यांनी सोम्या, गोम्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्या असा ज्यांचा उल्लेख केला त्या पदाधिकारी देखील असणार आहेत. त्यामुळे या बैठकीत वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?

खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात कुठल्यातरी सोम्या, गोम्या आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. शिवाय डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काहीही संबंध नसताना केलेले मोडतोडीचे व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे.

Medha Kulkarni vs Dheeraj Ghate
Dinanath Mangeshkar Hospital : पुणे महापालिकाचा कोट्यवधींचा 'टॅक्स' थकवल्याच्या आरोपावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दिलं उत्तर, म्हटले...

या संदर्भात सातत्याने परिसरातील नागरिकांचे नाराजीचे फोनही मला येत आहेत. दिल्लीतून अधिवेशनातून परतल्यावर मी याविषयी अनेकांकडून माहिती घेतली. पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते व त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखा‌द्या व्यक्तीचे, समूहाचे, किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, असं या पत्रात म्हटलं आहे.

शहराध्यक्षांनी काय उत्तर दिलं?

खासदार कुलकर्णी यांनी पाठवलेलं पत्र हे माध्यमांमार्फत मला समजलं. आमच्या पक्षाची एक चौकट आहे. पक्षाचे स्थानिक नेते आहेत, पदाधिकारी आहेत, पुण्यामध्ये पक्षाचे नेतृत्व करणारी चार जणांची टीम आहे. खासदार आमदार, मंत्री अशी सर्वच लोक पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्रित बसून आपलं काही मत असेल तर ते बैठकीमध्ये मांडलं पाहिजे. असं माध्यमांमध्ये एखाद्या गोष्टीवर व्यक्त होणं आणि त्याची चर्चा होणं हे सोयीचं नसल्याचं धीरज घाटेंनी म्हटलं आहे.

कोणी केलं होतं आंदोलन ?

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आला या आंदोलनामध्ये महिला मोर्चाच्या अध्यक्ष हर्षद फरांदे यांच्यासह स्नेहल दगडे पाटील, पुनम चौधरी, आरती कोंढरे, उज्वला गौड, स्वाती मोहोळ, रेणुका राठोड, भावना शेळके, सविता बलकवडे.

गायत्री भागवत अश्विनी पवार या भाजपा पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच भाजप पुणे शहर महिला आघाडी च्या वरील काही पदाधिकाऱ्यांनी एरंडवणे येथील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तोडफोड केली होती. सध्या याच घटनेवरून भाजपमध्ये अंतर्गत वादाची चिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Medha Kulkarni vs Dheeraj Ghate
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी इकडे हायकोर्टाचा सरकारला दणका अन् तिकडे त्याचे पालकच बेपत्ता

काय आहे बैठकीचा निरोप

मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4.30 वाजता घरकुल लॉन्स पुणे या ठिकाणी केंद्रीय सहकार, नागरी वाहतूक, राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास, वैद्यकीय शिक्षण, राज्यमंत्री, माधुरी मिसाळ आणि राज्यसभा खासदार, मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.

या बैठकीसाठी केंद्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवक,नगरसेविका, शहर पदाधिकारी, विधानसभा मंडल अध्यक्ष, मंडल निवडणूक अधिकारी, यांनी उपस्थित राहणं अपेक्षित असल्याचा निरोप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पदाधिकाऱ्यांना पाठवला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com