Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Voting For grampanchyat : निवडणुकीची रणधुमाळी; सांगलीत तब्बल ४१६ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

संभाजी थोरात

सांगली : राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज रविवार (ता.१८) मतदान पार पडत आहे. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय रंग चढला आहे. तर सांगली (sangli) जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. १ हजार ८१५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १० लाख २० हजार ४२४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. (Voting For grampanchyat)

गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचा प्रचार सुरू होता. या प्रचारामुळे सांगलीत ४१६ गावामधील वातावरण ढवळून निघाले. आज या ग्रामपंचायतीसाठी मतदान (Voting) होत आहे. यावेळी सरपंच निवड थेट असल्याने या निवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे. कारण जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समितीच्या निवडणुका देखील काही दिवसांनी आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी (political party) ताकद लावली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या आठवड्याभरापासून या निवडणुकीचा प्रचार सुरू होता. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. आज सकाळपासूनच मतदानास सुरवात झाली आहे. अनेक संवेदनशील गावामध्ये मोठा पोलीस (Police) बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे.

तर आता ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तर उमेदवारांनी मतदारांजवळ जाण्यासाठी सर्व प्रकारे कस लावला. आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT