Gram Panchayat Election : निवडणुकीचा धुरळा; पुणे जिल्ह्यातील १६७ गावांमध्ये आज मतदान

Voting For grampanchyat : साडेसात वाजता मतदानाला सुरूवात
Voting For grampanchyat
Voting For grampanchyat Sarkarnama

पुणे : राज्यातील तब्बल साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी या ग्रामपंचायतींसाठी मतदानला सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील एकूण २२१ ग्रामपंचायतींपैकी २७ ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य आणि ४९ गावचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर उर्वरित सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी आज रविवार (ता.१८) मतदान पार पडणार आहे. (Gram Panchayat Election)

यानुसार १७६ ग्रामपंचायतींच्या सर्वच्या सर्व सदस्यांसाठी, १८ ग्रामपंचायतींच्या अंशतः जागांसाठी आणि १६७ गावांचे सरपंच निवडीसाठी हे मतदान (Voting) होणार आहे. दरम्यान, मतदान अधिकारी आणि कर्मचारी शनिवारीच (ता.१७) सायंकाळीच निवडणूक होत असलेल्या गावांमध्ये दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले आहे. ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालणार आहे.

निवडणूक आयोगाने आक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केला होता. यामध्ये राज्यातील सात हजार ७७१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींचा (Gram Panchayat) पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Voting For grampanchyat
आघाडीच्या महामोर्चासाठी तीन कोटींचा खर्च? ठाकरेंचा पुढाकार, राष्ट्रवादीची साथ अन् काँग्रेसचा हात

निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुरंदर (Purandar) तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित १२ तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक ५४ ग्रामपंचायती या भोर तालुक्यातील आहेत. या निवडणुकीत पुरंदर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा समावेश नाही. उर्वरित ११ तालुक्यांपैकी भोरपाठोपाठ वेल्हे तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Voting For grampanchyat
Shrikant Shinde : सत्ता गेल्यानंतर माणूस कसा फडफडतो; खासदार शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

पुणे जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींसाठी पार पडणार मतदान

घोडेगाव, चांडोली बुद्रूक, कळंब, पारगाव तर्फे खेड, मेंगडेवाडी (सर्व ता.आंबेगाव), लोणी भापकर, मोरगाव, पणदरे, वागजवाडी (ता. बारामती), हर्णस, कर्नाव़ड , कारी, शिरवली तर्फे भोर, वेळवंड, हातनोशी, साळुंगण (ता. भोर), दापोडी, बोरीभडक, दहिटणे (ता. दौंड), पिंपरी सांडस, कदमवाकवस्ती, पेरणे, आव्हाळवाडी, गोगलवाडी (ता. हवेली), मदनवाडी, लाखेवाडी, डाळज नं. २, बिजवडी, कळशी, कुरवली, रेडणी, सराटी (ता. इंदापूर), साकोरी तर्फे बेल्हे, पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर), चास, बहुळ, मांजरेवाडी, शिरोली, शेलगाव (ता. खेड), वरसोली, गोडुंब्रे, शिरगाव (ता. मावळ), आडमाळ, मोसे खुर्द, पाथरशेत, कोंढूर (ता.मुळशी), मांडवगण फराटा, करंजावणे (ता. शिरूर) आणि दापोडे, धानेप, कोशिमघर, शिरकोली, वाजेघर बुद्रूक (ता. वेल्हे) आदींचा समावेश आहे.

Voting For grampanchyat
ShivSena : महामोर्चाच्या दिवशीच ठाकरेंना धक्का; विदर्भातील नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

पहिल्यांदाच मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती

- सोंडे हिरोजी, सोंडे कार्ला (ता.वेल्हे)

- विठ्ठलवाडी, झापवाडी (ता.जुन्नर)

निवडणूक होत असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

- भोर - ५४, वेल्हे - २८, दौंड - ०८, बारामती -१३, इंदापूर - २६, जुन्नर - १७, आंबेगाव - २१, खेड - २३, शिरूर - ०४, मावळ - ०९, मुळशी -११, हवेली - ०७.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com