Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat News Updates, Ahmednagar News
Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat News Updates, Ahmednagar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

थोरात-विखे गटात झाली चुरशीची फाईट : अखेर चिठ्ठीने निकाल फिरविला

आनंद गायकवाड

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्या गटांचे वर्चस्व आहे. या दोन गटांतील चुरशीची निवडणूक आश्वी बुद्रुक सहकारी सेवा संस्थेत झाली. ह्रद्याचे ठोके वाढविणारी ही निवडणूक जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहे. ( Election held in Thorat-Vikhe group: Finally, the result was reversed by letter )

संगमनेर तालुक्यातील काही गावे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदार संघाला जोडण्यात आले आहेत. यात आश्वी बुद्रुकचा समावेश आहे. आश्वी बुद्रुक हे गाव प्रशासकीयदृष्ट्या संगमनेर तालुक्याला, तर विधानसभेसाठी शिर्डी मतदारसंघाला जोडले गेल्याने, या सीमेवरील गावांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी थोरात व विखे या पारंपरिक दिग्गजांमधील सत्तासंघर्ष सातत्याने सुरू असतो. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आश्‍वी बुद्रुक सेवा संस्थेवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील गटाचे वर्चस्व होते, तर ग्रामपंचायत थोरात गटाच्या ताब्यात आहे. (Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat News Updates)

विखे गटाची यंत्रणा येथे असल्याने एकतर्फी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात होती, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व तुटपुंज्या कार्यकर्त्यांच्या बळावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रणित अमरेश्वर मंडळाने विजयाची पराकाष्ठा केली. मतमोजणीनंतर एका जागेसाठी दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 410 मते मिळाल्याने, चिठ्ठी टाकून कौल घेण्यात आला. त्यात जनसेवाचे नवनाथ किसन खेमनर यांना विजयी घोषित करण्यात आल्याने अमरेश्वरचे सहा, तर जनसेवाचे सात उमेदवार होवून सत्तेचे पारडे अवघ्या एका जागेने विखे गटाकडे झुकले.

आश्‍वी बुद्रुक सेवा संस्थेच्या 13 जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधारी विखे गटाला जबरदस्त टक्कर देत अमरेश्वर ग्रामविकास मंडळाने सहा जागा जिंकल्या, तर एका जागेसाठी दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून झालेल्या निर्णयानंतर विजयाचे पारडे विखे प्रणित जनसेवा मंडळाकडे झुकले.

सर्वसाधारण प्रवर्गातून दशरथ खेमनर (452), मच्छिंद्र गायकवाड (414), अण्णासाहेब जऱ्हाड (443), मच्छिंद्र ताजणे (414), तुळशिराम निघुते (441), ब्रिजमोहन बिहाणी (412), कैलास मुळे (426) हे उमेदवार विजयी झाले आहेत. नवनाथ खेमनर व कारभारी म्हसे या दोघांना समान मते मिळाली. चिठ्ठीद्वारे खेमनर यांना विजयी घोषित करण्यात आले. महिला राखीव प्रवर्ग वैशाली जऱ्हाड (440) व पार्वताबाई होडगर (456), अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग नामदेव शिंदे (438) इतर मागास प्रवर्ग ज्ञानेश्वर ताजणे (441), तर भटक्या, विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातून बाबूराव जऱ्हाड (447) हे विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस. वाकचौरे यानी काम पाहिले.

91 टक्के मतदान

दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान घडविण्याकडे दोन्ही गटांनी लक्ष दिले. एक एक मतदान घडवून आणले. परिणामी 13 जागांसाठी तब्बल 91 टक्के मतदान झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT