राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच केंद्र सरकारच्या योजनांचे श्रेय घेतेय

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद, श्रीरामपूर पंचायत समिती व नगर पालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यादृष्टीने श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील भाजपच्या सर्व शक्तीप्रमुख आणि बुथप्रमुखांचा मेळावा ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी बोलताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ( Radhakrishna Vikhe Patil said that the Mahavikas Aghadi government is taking credit for the central government's plans )

नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे यांनी शहर आणि तालुक्यातील सर्व शक्तीप्रमुख आणि बुथप्रमुखांचा मेळावा घेत कायर्कत्यार्ंना आलेली मरगळ झटकली. तसेच इतर कोणाशीही फिक्सिंग न करता, शतप्रतीशत भाजपची सत्तेसाठी आत्तापासूनच नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार समान लुटीच्या कार्यक्रमावर एकत्र...

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, केंद्र सरकाने देशातील जनतेला कोविड संकटात मदत केली. मोफत लसीकरण झाल्यामुळे देश आत्मनिर्भरतेने पुढे जात आहे. राज्य सरकार फक्त लस खरेदी करण्याच्या घोषणा करीत राहिले. आता महाविकास आघाडी सरकारच केंद्र सरकारच्या यासर्व योजनांचे श्रेय घेत असल्याची टीका आमदार विखे यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेसाठी 78 योजना राबवून गोरगरिबांना न्याय दिला आहे. केंद्रसरकाने देशातील जनतेला भरभरुन दिले आहे. आता त्यांना साथ देण्याची वेळ आल्याचे सुचित करून श्रीरामपूर पालिकेत भाजपला एकहाती सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटीबद्ध व्हावे. तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी केंद्राच्या योजना बुथ कमिटीच्या माध्यमातून गावागावात पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला आदित्य ठाकरे यांची कीव वाटते...

याप्रसंगी तालुक्याचे नवनिर्वाचीत अध्यक्ष दीपक पटारे यांना नियुक्तीचे पत्र आमदार विखे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, सुनिल वाणी, नानासाहेब शिंदे, शरद नवले, अनिल भनगडे, विठ्ठल राऊत, रेखा रिंगे, नानासाहेब पवार, दीपक चव्हाण, बाळासाहेब तोरणे, दत्ता जाधव, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, भाऊसाहेब थेटे, रामदास देठे, संपतराव चितळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com