Amar Sable  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha : लोकसभेसाठी इच्छूक अमर साबळेंवर सोलापुरातील भाजपच्या हॅट्‌ट्रीकची जबाबदारी!

BJP News : साबळे हे पक्षाचे एकनिष्ठ नेते आहेत. त्यांच्या निष्ठेची दखल घेऊनच साबळे यांना पक्षाने राज्यसभेवर संधी दिली होती.

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले माजी खासदार अमर साबळे यांच्यावर भाजपने सोलापूरची जबाबदारी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने साबळे यांच्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारी नसली तरी सोलापूर मतदारसंघाच्या निवडणुकीची जबाबदारी मात्र साबळेंना देण्यात आली आहे. (Election of Amar Sable as coordinator of Solapur Lok Sabha Constituency)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी खासदार साबळे यांच्याकडे हे पद सोपविण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांना तातडीने कामाला लागण्याचेही सूचित करण्यात आलेले आहे. साबळे हे पक्षाचे एकनिष्ठ नेते आहेत. त्यांच्या निष्ठेची दखल घेऊनच साबळे यांना पक्षाने राज्यसभेवर संधी दिली होती.

भाजपने लोकसभा (Loksabah) २०२४ महाविजय संकल्प अभियान सुरू केले आहे. त्या अभियानाच्या अंतर्गत साबळे यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या तयारीची महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित आहे. विशेष म्हणजे अमर साबळे हे मागील लोकसभा निवडणूक सोलापुरातून लढविण्यासाठी इच्छुक हेाते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना तिकिट नाकारण्यात आले होते.

Amar Sable Appointed Letter

सोलापूर लोकसभेची जागा भाजपने (bjp) सलग दुसऱ्यांदा जिंकली आहे. आता साबळे यांच्यावर हा सोलापूर मतदारसंघ कायम राखण्याची मोठी जबाबदारी आहे. मोदी लाटेत २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद बनसोडे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. काँग्रेससाठी ती मोठी धक्कादायक घटना होती.

माजी खासदार शरद बनसोडे यांच्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. त्यामुळे दोन वेळा जिंकलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर हॅट्‌ट्रीक करण्याची मोठी अवघड जबाबदारी साबळे यांच्यावर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT