Makrand Patil News, Kisan veer sakhar karkhana election 2022 Latest News
Makrand Patil News, Kisan veer sakhar karkhana election 2022 Latest News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'किसन वीर'ची निवडणूक : महिला राखीव गटातही आमदार गटाची आघाडी

Umesh Bambare-Patil

सातारा : किसन वीर कारखाना निवडणुकीत आज सुरू असलेल्या मतमोजणी महिला राखीव गटातील दोन जागांमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलच्या महिला पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. यामध्ये सुशीला जाधव यांना १०९१५, सरला श्रीकांत वीर १०७१० मते मिळाली आहेत. तर विरोधी आशा फाळके यांना ६९७१ तर विजया साबळे यांना ६८७७ मते मिळाली आहेत. (Kisan veer sakhar karkhana election 2022 Latest News)

वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत ६९ टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज वाईतील श्रीनिवास मंगल कार्यालय एमआयडीसी येथे सुरू आहे.

पहिल्या फेरीत आरक्षित जागांची मतमोजणी झाली, यामध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनी विजयी सलामी दिली. तसेच त्यानंतर महिला राखीव गटाची मोजणी झाली. यामध्येही आमदार पाटील यांच्या पॅनेलच्या दोन्ही महिला ३९४४ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत.

महिला राखीवमध्ये उमेदवारनिहाय पडलेली मते अशी किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनल - सुशीला जाधव १०९१५, सरला श्रीकांत वीर १०७१०, शेतकरी विकास पॅनेलच्या आशा फाळके ६९७१, विजया साबळे ६८७७, मताधिक्य : ३९४४ आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT