Sugar Factory  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Election of sugar factories : ‘वसंतदादा’, ‘महांकाली’साठी धूमशान; 36 हजार मतदार ठरवणार इच्छुकांचे भवितव्य

Election of ‘Vasantdada’ and ‘Mahankali’ sugar factories : ‘वसंतदादा’, ‘महांकाली’साखर कारखान्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 9 मार्च, आणि 23 मार्चला मतदान होणार आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : गेली दोन वर्षे विविध कारणांनी रखडलेल्या ‘वसंतदादा’ साखर कारखाना आणि ‘महांकाली’ साखर कारखान्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दोन्ही कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून वसंतदादाचे मतदान 9 मार्चला होणार आहे. तर मतमोजणी 10 मार्चला असेल. महांकाली कारखान्यासाठी 23 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. याबाबतचा कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोल्हापूर विभागाचे सहसंचालक गोपाळ मावळे यांनी घोषित केला आहे.

वसंतदादा कारखाना

वसंतदादा कारखान्याच्या 21 संचालक पदांसाठी निवडणूक होणार असून 53 इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत. त्यातील तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वसंतदादा कारखान्याच्या सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटांमधून प्रत्येकी 3 असे एकूण 15, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदारसंघ क्रमांक 2 आणि अनुसूचित जाती किंवा जमाती मागासवर्गीय 1, भटक्या-विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गमधून 1 असे 21 संचालक निवडून द्यायचे आहेत.

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अंतिम मुदत 7 फेब्रुवारी आहे. अर्जांची छाननी 10 फेब्रुवारीला करण्यात येणार असून अवैध अर्जाची प्रसिद्धी 11 फेब्रुवारी केली जाणार आहे. तर 11 ते 25 फेब्रुवारी या काळात अर्ज मागे घेण्याची मुदत असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी 27 फेब्रुवारीस प्रसिद्ध केली जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास 9 मार्चला सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान घेतले जाईल. 10 मार्चला सकाळी 8 पासून मतमोजणी सुरू होणार असून लगेच निकाल घोषित होणार आहे.

महांकाली साखर कारखाना

दरम्यान कवठेमहांकाळ तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या महांकाली साखर कारखान्याची देखील पंचवार्षिक निवडणूक नुकतीच घोषित झाली आहे. यामुळे निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली चालवल्या आहेत; तर विरोधक निवडणूक लावण्यावर ठाम हेत. निवडणूक लागणार की, बिनविरोध होणार, याकडे सभासदांचे लक्ष आहे. नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी, नामनिर्देशन यादी प्रसिद्ध 11 फेब्रुवारी, अर्ज छाननी 14 फेब्रुवारी आणि अर्ज माघार 17 फेब्रुवारीपर्यंत घेता येणार आहे. तर अंतिम यादी देखील याच दिवशी प्रसिद्ध केली जाईल. मतदान 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत होईल, तर 25 रोजी मतमोजणी होणार आहे.

36 हजारांवर मतदार

वसंतदादा कारखान्याचे कार्यक्षेत्र विस्तारित असून येथे पाच गट आहेत. ज्यात सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगावचा परिसर येतो. येथे अंतिम मतदार यादितील 36 हजारांवर असणारे मतदार 21 संचालक पदांसाठी उभारणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

सध्या कारखाना ‘दत्त इंडिया’कडे

वसंतदादा कारखाना सध्या श्री दत्त इंडिया कंपनीकडे चालविण्यासाठी दिला असून 5 जुलै 2017 रोजी तो दहा वर्षांच्या कराराने दिला होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्ज थकबाकी वसूल करण्यासाठी बँकेने हा कारखाना चालविण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर तो ‘दत्त इंडिया’ला चालविण्यास देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT