Solapur, 17 July : राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी १५ हजार ३००, तर सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २७ पैकी ७०२ ग्रामपंचायतींची ऑक्टोंबर महिन्यातच निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. ग्रामंपचायत निवडणुकीमुळे ऐन ‘ऑक्टोबर हिट’मध्ये गावगाडा तापण्याची चिन्हे आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ एप्रिल २०२६ रोजीची मतदार यादी वापरली जाणार आहे.
ऑक्टोबरमध्ये निवडणूक होऊ घातलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत २०२४ आणि २०२५ मध्ये संपलेली आहे, तर काहींची मुदत २०२६ मध्ये संणार आहे. काही नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संगणक प्रणालीच्या माध्यमातून मतदारयाद्या तयार केल्या जाणार आहेत. येत्या २४ जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
प्रभागनिहाय प्रारूप आणि अंतिम मतदार यादी ही महाआयटीने डेव्हल्प केलेल्या सॉफ्टवेअरद्वारे तयार करण्यात येणार आहे. मतदार याद्यांसाठी https://mahasecvoterlist.in ही लिंक राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा युजर आयडी व पासवर्ड हा कलेक्टर ऑफीसकडे देण्यात आला आहे. त्यावरून तालुक्यांनिहाय यूजर आयडी आणि पासवर्ड तयार केला जाणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतनिहाय एकूण प्रभागांची संख्या आणि विधानसभा क्रमांक भरला जाणार आहे.
प्रारूप मतदार यादी शुक्रवारी (ता. २४ जुलै) प्रसिद्धी झाल्यानंतर त्यावर २९ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील. त्यासाठी सहा दिवसांची वेळ आहे. प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष निवडणुका होण्याची शक्यता आहे.
असा असेल मतदार यादीचा कार्यक्रम
प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी : २४ जुलै
हरकती व सूचनांसाठी कालावधी : २४ ते २९ जुलै
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी : ४ ऑगस्ट
निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या ग्रामपंचायती
तालुका............. ग्रामपंचायती
मंगळवेढा............ ३०
पंढरपूर................७८
करमाळा.............. ५४
माढा................... ८५
माळशिरस.............. ५७
बार्शी................... १००
मोहोळ.................. ७६
अक्कलकोट............ ७७
दक्षिण सोलापूर.......... ५४
सांगोला...................६७
उत्तर सोलापूर.............२४
एकूण.................... ७०२
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.