Padlakar on Ansari's Statement : श्रीकृष्णाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या मौलानाचा पडळकरांनी घेतला खरपूस समाचार : ‘ अगोदर त्याचा डीएनए चेक करा...’

Maulvi Ansari's Controversial Statement About Shri krashana : श्रीकृष्णाबाबत मौलाना जर्जिस अन्सारी याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत कठोर शब्दांत टीका केली आहे.
Gopichand Padalkar-Maulvi Georgia Ansari
Gopichand Padalkar-Maulvi Georgia AnsariSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 July : श्रीकृष्ण हे मुस्लिम होते, ते पाच वेळा नमाज पठण करत होते, असे वादग्रस्त विधान करणारे मौलाना जर्जिस अन्सारी यांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला आहे. असे विधान करणाऱ्या मौलानाला आधी ठोकला पाहिजे, त्याचा पहिला डीएनए तपासला पाहिजे, त्यात तोसुद्धा हिंदूच असल्याचे आढळून येईल, असा दावा पडळकर यांनी केला आहे.

भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या विधानावर भाष्य केले. ते म्हणाले, श्रीकृष्णाबद्दल असं विधान करणाऱ्याा त्या मौलानाला आधी ठोकला पाहिजे. त्याचा पहिला डीएनए तपासला पाहिजे. त्याचा DNA तपासला तर लक्षात येईल, तोसुद्धा हिंदूच आहे

श्रीकृष्ण कोण आहे, हे सर्व जगाला माहिती आहे. कोणीतरी मौलानाने बोलावं आणि त्यावर आम्ही व्यक्त व्हावं, अशी गरज वाटतं नाही. परंतु त्या मौलानाचा डीएनए तपासल्यावर तो मौलानाच 24 तास कृष्ण मंदिरात बसेल, असा दावाही गोपीचंद पडळकर यांनी केला.

सोलापूरमध्ये एटीएसने केलेल्या कारवाईसंदर्भात पडळकर म्हणाले, एटीएसने राज्यात मोठ्या प्रमाणात 100 तरुणांची तपासणी केली आहे. चुकीचं वागणाऱ्यांवर एटीएसने कारवाई केली आहे. अशी भडवेगिरी कोणी करत असेल तर त्यांना ठोकून काढलं पाहिजे. देशाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या लोकांना ठोकून काढलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे.

संजय राऊत यांच्या रामरक्षा आंदोलनासंदर्भात पडळकर म्हणाले, संजय राऊत याला एवढी अक्कल पाहिजे की प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणं आणि सत्ता स्थापन केली. आता तुम्हाला राम आठवतोय का?

Gopichand Padalkar-Maulvi Georgia Ansari
Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांना आज शांत झोप लागेल; पण त्यांच्या मंत्रिपदामुळे मला काही फरक पडत नाही : गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

ज्यांनी रामाचं अस्तित्व मान्य केलं नाही, त्यांच्या सोबत बसायचं आणि आता असली आंदोलन करायची.. लोक सगळं बघतायत. प्रभू रामचंद्रांबद्दल तुमची बदललेली भूमिका ही लोकांनी अनुभवलेली आहे. संजय राऊत काय बोलतायत, याला काही फार महत्व नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमीर खानच्या मुद्यावर नीतेश राणेंना पाठिंबा

गोपीचंद पडळकर म्हणाले, आमिर खाने याने तीन लग्न केली, तीनही हिंदू महिलांसोबत केली. अमीर खानचा अजेंडा ठरवून चालेला आहे. नीतेश राणे म्हणाले आमिर खान लव्ह जिहादचे ब्रँड अम्बॅसिडर आहे आणि हा तसाच प्रकार आहे. काही लोक त्यांना फॉलो करतात, त्यांनी असंच करावे अशी त्यांची भावना दिसतंय. त्यामुळे त्यांच्याबद्दल हिंदू धार्मियांच्या मनात मोठा राग निर्माण झाला आहे. राज ठाकरे त्यांच्या लग्नाला का गेले, ते त्यांनाच माहिती.

Gopichand Padalkar-Maulvi Georgia Ansari
Builder Suicide : अनेक लोक आत्महत्या करतील, त्यात माझाही नंबर असेल : बिल्डर आत्महत्या; धंगेकरांचा धक्कादायक खुलासा, पत्नीच्या भागीदारीबाबतही भाष्य...

आम्हाला आमदार निवास मिळेना

सचिन अहिरांना बंगला न मिळाल्याबद्दल ते म्हणाले, ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत, ते ही अडचण सोडवतील. आता आम्हाला आमदार निवास नाही. मनोरा आमदार निवास पाडल्यामुळे असे अनेक आमदार आहेत की ज्यांना स्वतःला आमदार निवास नाही. कोणाला फ्लॅट, बंगला द्यायचा, हे त्या त्या परिस्थितीनुसार ठरते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com