MLA Rohit Pawar
MLA Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातील हत्तीही चालले गुजरातच्या दिशेने : रोहित पवारांनी केली स्थलांतर थांबविण्याची मागणी

सरकारनामा ब्युरो

Rohit Pawar : वाणिज्य अस्थापना, उद्योग, आमदार या पाठोपाठ महाराष्ट्रातील हत्ती सुद्धा गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्रात असलेल्या हत्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना येथील हत्ती गुजरातला नेले जात आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. मात्र यावर काहीही अंमलबजावणी झाली नाही. अखेस आमदार पवार यांनी चक्क महाराष्ट्रातील हत्ती गुजरातला नेले जात असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर टाकला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राची अस्मिता वाचविण्याचा आवाहन केले आहे.

सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. मात्र त्याच वेळी महाराष्ट्राची अस्मिता ठरेल असे गडचिरोली जंगलातील हत्ती गुजरातच्या दिशेने नेले जात आहेत. डोंगर, किल्ले, वन, प्राणी, भाषा, साहित्य, संस्कृती ही महाराष्ट्राची अस्मिता राहिले आहेत. यातच राज्यातील हत्तीची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असताना हे हत्ती दुसऱ्या राज्यात नेले जात असल्याबाबत रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, गजमुख असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव आपण सर्वजण साजरा करत असताना महाराष्ट्रातील एकमेव गडचिरोलीतील कमलापूरच्या हत्ती कॅम्पमधील हत्ती मध्यरात्री गुपचूपपणे गुजरातला हलवणं हा राज्याच्या अस्मितेवर घाला आहे. हा विषय मी यापूर्वीही विधानसभेत मांडला आहे, असे म्हणत त्यांनी हत्ती नेले जात असल्याचा व्हिडिओही अपलोड केला आहे.

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, हा विषय लहान वाटंत असला तरी राज्याच्या अस्मितेचा आहे आणि राज्याची अस्मिता ही महान आहे. त्यामुळं पालकमंत्री असताना हत्तीचं संरक्षण करण्याचं दिलेलं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळावं, अशी माझी त्यांना विनंती आहे आणि ते पाळतील, असा विश्वासही आमदार पवार यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT