रोहित पवार म्हणाले, पाणंद रस्त्याच्या कामावरून विरोधकांकडून धुरळा उडवण्याचे काम...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar : कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील पाणंद रस्त्यांच्या कामात उपहार झाल्याचा आरोप भाजपचे विधानपरिषदेतील आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी केला होता. त्यानुसार राज्य सरकारने या कामावर चौकशी समिती नेमली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मतदारसंघात झालेल्या रस्त्यांवरून केवळ धुरळा उडवण्याचे काम विरोधकांकडून होत असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

आमदार पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांसाठी निधी आणला आणि सरकारचा पैसा जपून वापरताना मुरमीकरण व माती कामातूनही रस्त्यांची गुणवत्ता राखता येते, हे दाखवून दिले. त्यामुळे नेहमीप्रमाणे लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे उद्योग विरोधकांकडून केले जात आहे. मतदारसंघात मागील अडीच वर्षांत दीड हजार किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे केवळ पाणंद रस्ते तयार झाले असून, याचा एक लाख 80 हजार पेक्षाही अधिक लोकांना फायदा झाल्याचा दावा त्यांनी केला.

MLA Rohit Pawar
नागेश पवार मृत्यूप्रकरणी रोहित पवार, राम शिंदेंनी उठविला विधीमंडळात आवाज

2020-21 मध्ये ‘पालकमंत्री पाणंद रस्ते योजने’अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ‘मातोश्री पाणंद रस्ते योजने’अंतर्गत शेत वहिवाटीचे रस्ते तयार केले. आजवर या रस्त्यांवर केवळ अतिक्रमणे होती, तर काही रस्ते अस्तित्वातही नव्हते. कर्जत तालुक्यात 423 आणि जामखेड तालुक्यात 476 पाणंद रस्त्यांचे मातीकाम आणि मुरमीकरण पूर्ण केले.

मतदारसंघातील नागरिक, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वयामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांची कामे झाली. विशेष म्हणजे राज्यात अन्य ठिकाणी आणि कर्जत-जामखेड तालुक्यांत पाणंद रस्त्यांच्या एक किलोमीटरसाठी मंजूर झालेला निधी, याची तुलना केली तर राज्यात सर्वांत कमी खर्चात उत्तम प्रतीचे रस्ते कर्जत-जामखेडमधील प्रशासनाने करून दाखविले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु शासन निर्णयात प्रत्यक्ष असलेल्या अटी-शर्तींबाबत आणि झालेल्या कामांवर किती खर्च झाला, याची शहानिशा न करता स्थानिक प्रशासनाची पिळवणूक करण्यासाठी विरोधकांकडून राजकारण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

MLA Rohit Pawar
कर्जत-जामखेडमधील रस्त्याच्या कामात अपहाराचा आरोप : चार सदस्यीय समिती चौकशी करणार

यापूर्वीच्या दहा वर्षांत होणे अपेक्षित असलेली रस्त्यांची कामे ही कोरोना महामारी असतानाही केवळ अडीच वर्षांतच झाल्याने रस्त्यांवरुन सुरू असलेली धूळफेक ही विरोधकांची पोटदुखी आहे. गेली दहा वर्षे काहीही न केलेल्या कामाचा फुगा फुटल्याने नैराश्यातून लोकांची दिशाभूल केली जातेय. परंतु कर्जत-जामखेडकर नागरिक कुठल्याही भूलथापांना बळी पडत नाही, हे अडीच वर्षांपूर्वीच दिसले आहे. त्यामुळे मागील दाराने आलेल्या कुणी कितीही रडारड केली, तरी त्याचा उपयोग नाही. सामान्य माणूस आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मी यापुढेही लढत राहील आणि अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करत राहील.

- रोहित पवार, आमदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com