अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सांगली जिल्ह्यात महावितरणचे कार्यालय ( MSEDCL office)पेटवून दिले. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty)यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut)यांनी राजू शेट्टी यांना इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी महावितरण कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राज्य सरकार मात्र, या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. यावर नितीन राऊत म्हणाले, ''हिंसेने प्रश्न सुटत नाही, उद्या काही विपरीत घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार राजू शेट्टी राहतील,'' राऊत साम टिव्हीशी बोलत होते.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. रविवारी सांगली जिल्ह्यात संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण चे कार्यालय जाळले. या संदर्भात आज ऊर्जामंत्री राऊतांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर राऊत म्हणाले, ''हिंसेने प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडायला संवाद असतो. त्यांना मी सांगितलं माझ्याशी चर्चा करा जे शक्य असेल ती मी भूमिका घेईल. त्यांनी ते ऐकलं नाही. त्यामुळे हिंसेतून काही विपरीत घडल्यास त्याला सर्वस्वी राजू शेट्टी जबाबदार राहतील,''
नितीन राऊत (Nitin Raut)यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राऊतांनी थकबाकीदारांचा वीज पुरवठा (power supply)खंडित करणार असल्याचे सांगितले.
नितिन राऊत म्हणाले, ''कोरोना काळात सर्वत्र ताळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीज पुरवठा करण्यात आला. कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले याची आम्हाला कल्पना आहे. पण जर वीज वापरली असेल तर येणाऱ्या देयकाचे पैसे भरावेच लागेल,'' वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन राऊतांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.