सोनई (अहमदनगर) : महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पूत्र उदयन गडाख शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे जावई होणार आहेत. ही बातमी पसरताच उदयन यांच्या नावाची राज्यभर चर्चा सुरू झाली. त्यांच्या रुपाने गडाख कुटूंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे. Entry of Udayan Gadakh in Mula Institute: Selection as Vice President
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व संघटनेची संपुर्ण जबाबदारी स्वीकारत तालुक्यात पायाला भिंगरी लावत यशस्वी राजकीय वारसा पुढे नेत युवकांचे मोठे संघटन केलेल्या युवानेते उदयन गडाख यांची आज मुळा एज्युकेशन संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.या निवडीने तालुक्यातील युवकांत मोठे नवचैतन्य निर्माण झाले आहे.
गडाख यांच्यावर मंत्रीपद व उस्मानाबादच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पडल्यानंतर युवानेते उदयन गडाख यांनी प्रत्येक वाड्यावस्त्या व तालुक्यातील गावांना भेटी देवून जनसंपर्क वाढविला. युवकांचे मोठे संघटन करत त्यांनी संघटना बळकट केली. अनेक सार्वजनिक प्रश्न त्यांनी पाठपुरावा करत सोडले. सर्वसामान्यांना ते आपले वाटू लागले.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख संस्थापक असलेल्या मुळा एज्युकेशन संस्थेचे सोळा माध्यमिक विद्यालय, सहा इंग्रजी माध्यमाचे विद्यालय तर अन्य सात महाविद्यालय असून 20 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचा एकूण 1300 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. संस्था व यशवंत प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
संस्था अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख सध्या आजारी असल्याने जेष्ठ नेते गडाख यांच्या सूचनेनंतर काही महिन्यांपूर्वी नवीन नऊ सदस्य निवडण्यात आले होते. आज सर्व सदस्यांची पहिली बैठक झाली.यामध्ये सर्वानुमते गडाख यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपस्थित ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव उत्तम लोंढे यांनी आभार व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.