टाकळी ढोकेश्वर ( अहमदनगर ) : विधानसभेच्या 2019मधील सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलेश लंके यांना पराभव केला. शिवसेनेचे विजय औटी हे अभ्यासू नेते म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणांनी अनेक वेळा विधानसभेतील अधिवेशने गाजवली होती. Shankarrao Gadakh said, Parnerkar missed the opportunity of the post of Minister ...
पारनेरमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा प्रभारी मंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख उपस्थित होते. मंत्री शंकरराव गडाख यांना विजय औटींचे कौतुक केले. आमदार नीलेश लंकेंना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत आव्हान उभे करण्यासाठी मंत्री शंकरराव गडाख मैदानात उतरले आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी होते. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहकले, श्रीकांत पठारे, युवा सेना प्रमुख नितीन शेळके, शहरप्रमुख निलेश खोडदे, अनिकेत औटी, युवराज पठारे उपस्थित होते.
मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, महाविकास आघाडी सरकार बनविताना अनेक अडचणी आल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही निर्णय घ्यावे लागले ते कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरत आहेत. याची जाणीव मलाही आहे. मला मंत्री व्हायचे नव्हते मात्र ती संधी मला मिळाली मात्र औटी यांच्या पराभवाने पारनेरकरांनी मंत्री पदाची संधी हुकवली, असे मत शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले.
गडाख पुढे म्हणाले, जिल्हाभरातून मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिकांची मरगळ झटकून टाकली आहे. राजकारणात पदोपदी फसविले जाते अपयश येते. स्वतःची ताकद सिद्ध करावी लागते आणि विकासकामे करावी लागतात. महसूल, पोलिस प्रशासनाने शिवसैनिकांना त्रास देऊ नका, मी पण गडाख आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा गडाख यांनी दिला.
घड्याळाला मत द्या असे कधीच म्हणणार नाही - विजय औटी
आगामी येणाऱ्या बाजार समिती, नगरपंचायत जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका समविचारी लोकांना बरोबर घेऊन लढणार आहोत. यात घड्याळाला मत द्या असे कधीच म्हणणार नाही, असे वक्तव्य करत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नसल्याचे विजय औटी यांनी जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.