Nitin Gadkari  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

इथेनॉल देशाचे अर्थकारण बदलेल

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 4 हजार 74 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांच्या हस्ते झाला.

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 4 हजार 74 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी कृषी व ऑटोमोबाईल क्षेत्रातील पुढील बदलांबाबत महत्त्वाचे विधान केले. Ethanol will change the economy of the country

नितीन गडकरी म्हणाले, उद्योग आणायचा असेल तर उद्योजकांना पाणी, वीज, दळणवळण व कम्युनिकेशन या चार गोष्टींची गरज लागते. इंधन दरवाढ जात अथवा धर्म विचारत नाही. अमेरिका रस्ते चांगले आहेत म्हणून श्रीमंत आहे. अहमदनगर जिल्ह्याला विकासाचा इतिहास आहे. विखेंनी येथे कारखानदारीचा विकास केला. देशातील सर्वात जास्त दरडोई उत्पादन कोल्हापूर जिल्ह्याचे आहे. अहमदनगर जिल्हा दुष्काळी असला तरी येथे साखर कारखानदारी आल्याने इथला विकास झाला.

दूध उत्पादनातूनही शेतकऱ्यांचा विकास होत आहे. विदर्भात जेवढे दूध उत्पादन होत नाही तेवढे एकट्या पुणे अथवा कोल्हापूर जिल्ह्यात होते, याची मला लाज वाटते. देशी गायांच्या जातींना चांगला संकर झाल्यास दूध उत्पादन वाढेल. दूध उत्पादनात विदर्भ म्हणजे नापासांची शाळा आहे. तेथे आता देशी गायींच्या संकरासंदर्भातील प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे देशी गाई 30 लीटरपेक्षाही जास्त दूध देऊ शकतील.

देशात इथेनॉलचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. उसाचा रस, गहू, तांदळापासून इथेनॉल बनविण्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्राने 450 लोकांना अशा इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. पुणे, अहमदनगर सारख्या जिल्ह्यांत इथेनॉल निर्मिती सुरू झाली आहे. ब्राझीलमध्ये सर्व वाहने इथेनॉलवर चालतात. विमानही इथेनॉलवर चालते.

शेतकरी नुसते पीक उत्पादनच नव्हेतर वीज व इंधन निर्मिती क्षेत्रातही यामुळे येई शकतील. इथेनॉलच्या पेट्रोल पंपांनी केंद्राने मान्यता देण्यास सुरवात केली आहे. सर्व पेट्रोल व डिझेल वाहनांत फ्लेक्स इंजिन बसवून ती वाहने संपूर्णपणे इथेनॉलवर चालविता येऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांचा पैसा तर वाचेलच शिवाय देशाचा इंधनावरील आयातीचा मोठा खर्चही वाचेल. शिवाय शेतकरी व साखर कारखान्यांना आर्थिक फायदा होईल. त्यामुळे देशातील वाहन कंपन्यांना मी संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी वाहने तयार करण्यास सांगितले आहे. इथेनॉल देशाचे अर्थकारण बदलेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार रोहित पवार, बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, अरूण जगताप, संग्राम जगताप, माजी मंत्री राम शिंदे, महापौर रोहिणी शेंडगे, भाजपचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT