Hasan mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : शिंदे गटाचे पालकमंत्री असतानाही कुलूप तोडण्याची हिंमतच कशी झाली? हसन मुश्रीफ संतापले !

Hasan Mushrif On Eknath Shinde Group : ...म्हणून मी यात लक्ष दिलं नाही!

Chetan Zadpe

राहुल गडकर -

Kolhapur News : कोल्हापुरात सध्या शेतकरी संघाची जागा जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, पण आपण यात का लक्ष घातले नाही याचे कारण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्ह्यात खासदार शिंदे गटाचे आहेत, पालकमंत्री शिंदे गटाचे आहेत, वास्तविक त्यांनी हा प्रश्न हाताळला पाहिजे म्हणून मी यात भाग घेतला नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. पण भविष्यकाळात शेतकरी संघाचे सर्व प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासनही मुश्रीफ यांनी दिले. (Latest Marathi News)

"कोल्हापूर शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष कै. विठ्ठलराव शंकरराव शिंदे तथा बाबा नेसरीकर यांच्या 13 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित राजर्षी शाहू स्मारक भवन येथील कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकरी संघाची प्रतिमा कशी उंचावू शकते, हे बाबांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. सहकारात निरपेक्षपणे काम करणारे बाबा यांनी शेतकरी संघ केवळ खतांपुरते मर्यादित न ठेवता, अनेक प्रकारचे उत्पादन आणि उद्योग निर्माण केले. शेतकरी संघाच्या अडचणी सोडवण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून प्रयत्न करेन, पण पेट्रोल पंपाबाबत खासदार संजय मंडलिक यांनी प्रश्न सोडवावेत," असे मुश्रीफ म्हणाले.

"एमआयडीसी येथे मिरची पूड कारखान्याबाबत एनओसी मिळत नाही. उद्योगमंत्री शिंदे गटाचे उदय सामंत आहेत. त्यांच्याकडून परवानगी मिळायला अडचण काय आहे?" असा सवालही मुश्रीफ यांनी केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर मुश्रीफ यांचा रोष

जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आहेत. खासदार संजय मंडलिक आहेत. आमदार ही सगळे शिंदे गटाचे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी कुलूप तोडण्याचे धाडस केले कसे ? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. या प्रसंगी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, यशोधन शिंदे, राष्ट्रवादीचे अनिल घाटगे यांच्यासह संघांचे आजी-माजी कर्मचारी उपस्थित होते.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT