Kolhapur-Sangli Politics : कोल्हापूर, सांगली भाजपत अंतर्गत वादाची ठिणगी; बावनकुळे कसा सोडवणार तिढा ?

BJP Politics : सांगलीत भाजपने जिल्ह्यात जंबो कार्यकारिणी जाहीर केली.
Kolhapur-Sangli Politics :
Kolhapur-Sangli Politics :Sarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur Politics : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील भाजपचा अंतर्गत वाद हा विकोपाला गेला आहे. जुना आणि नवा वाद हा समोर आल्याने भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आणि सांगली जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत हा अंतर्गत वाद वाढला आहे.

या दोन्ही जिल्ह्यांत नवे पदाधिकारी निवडून सुरू झालेला वाद हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहाेचला आहे. पुढील महिन्यात बावनकुळे हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. जुना-नवा वाद हा प्रदेशाध्यक्ष कसा सोडवणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Kolhapur-Sangli Politics :
Kirit Somaiya Video : किरीट सोमय्यांना 'व्हिडिओ व्हायरल'ची धमकी; मागितली ५० लाखांची खंडणी

मिरजेत कामगारमंत्री खाडे विरुद्ध मोहन व्हनखंडे सांगलीच्या मिरज विधानसभा मतदारसंघात कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी आपल्या पुत्राला लॉन्च केल्यानंतर एकेकाळी त्यांचे स्वीय सहायक असलेले मोहन व्हनखंडे यांनी विधानसभेची तयारी सुरू ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या दहीहंडी सोहळ्यात दोघांमधील राजकीय विरोध पाहायला मिळाला. दोघेही भाजपमध्ये असले तरी एकमेकांच्या विरोधात उभे असणार हे निश्चित मानले जात आहे.

आटपाडीत देशमुख गटाची नाराजी

भाजपने सांगली जिल्ह्यात जंबो कार्यकारिणी जाहीर केली. मात्र, देशमुख गटाशी निवडीवर चर्चा करून, नावे घेऊनही डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमांवर पक्षाबद्दल तीत्र नाराजी व्यक्त केली आहे. पदाधिकारी निवडीतून वगळल्याने तीव्र निषेध नोंदवला. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी जिल्ह्यातून ९० पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणीची निवड केली. ही कार्यकारिणी निवडताना प्रत्येक तालुक्यातील मुख्य नेतेमंडळीशी चर्चेनंतर त्यांच्याकडून नावे घेतली होती. देशमुख गटाशीदेखील काही नावे घेतली होती.

मात्र, या पदाधिकारी निवडीत त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश केला नाही. तालुक्यातून युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अनिल पाटील, तालुकाध्यक्षपदी जयवंत सरगर, बाळासाहेब सरगर, विलास काळेबाग, जयवंत रणदिवे, हणमंत मगर, रावसाहेव खटके, सुमन पाटील यांच्या निवडी जाहीर केल्या. मात्र, यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. जम्बो कार्यकारिणीच्या निवडीत देशमुख गटाला स्थान मिळाले नाही, तेव्हा नाराज कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर निवडीचा निषेध केला आहे.

शिरोळमध्ये ही पडली वादाची ठिणगी

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गडहिंग्लजबरोबर शिरोळमध्येही आता जुना विरुद्ध नवा असा वाद सुरू झाला आहे. भाजप पदाधिकारी नवनियुक्तवरून जुने कार्यकर्ते नाराज झाले असून, त्याबाबतच्या भावनाही पक्षश्रेष्ठी यांच्याकडे कळवल्या आहेत. त्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा जुने पदाधिकारी कामात बदल ठेवतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.

Kolhapur-Sangli Politics :
Omraje Nimbalkar News : 'हे' ट्रिपल इंजिनचे सरकार बघा, मराठा आरक्षण किती गांभीर्याने घेतंय; ‘त्या’ व्हिडिओवरून ओमराजे संतापले...

गडहिंग्लजमध्येही भाजपचे काम बंद

जिल्ह्यातील आजऱ्यापाठोपाठ गडहिंग्लजमध्येही भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नव्या पदाधिकारी निवडीबद्दल उद्रेकाला रविवारी जुन्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी वाट करून दिली. पत्रकार परिषद घेत माजी जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे यांनी भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी त्याग केला, संघटना उभी केली. परंतु, नव्याने आलेल्यांना पदे देण्यात आली. हे योग्य नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना जुन्या कार्यकर्त्यांची फरफट होत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या रद्द होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

आजऱ्यात कार्यालयातील फलक काढले

भाजपच्या पदाधिकारी निवडीवरून आजरा तालुक्यात वादाची ठिणगी पडली आहे. जुन्या आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी नव्या निवडीबाबत संताप व्यक्त करत जिल्हा पातळीवरील नेत्यांवर निशाणा साधला आहे. आजरा भाजपमध्ये अनेक वर्षांपासून धुसफूस सुरू होती. नव्या निवडीच्या निमित्ताने ती सर्वांसमोर आली आहे. वरिष्ठ नेतेमंडळींकडून आमची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोपही तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यातूनच पक्षाचे कार्यालय बंद करून नामफलकही काढून ठेवण्यात आलेला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Kolhapur-Sangli Politics :
Omraje Rajenimbalkar News : भाजपचा जनाधार ढासळत चाललाय; ओमराजे निंबाळकरांची टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com