Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

निवडणूक स्थगित तरीही गुरुजींचा प्रचार थांबेना

सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारकडून तातडीने स्थगित करण्यात आल्या आहेत.

दौलत झावरे

अहमदनगर - राज्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारकडून तातडीने स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. ही निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली असली, तरी मंडळांसह उमेदवारांकडून मात्र प्रचार सुरू आहे. ( Even if the election is suspended, the teachers' campaign will not stop )

पावसामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक प्रक्रिया स्थिर झाली आहे. निवडणूक स्थगित झाल्याने काहींना फायदा तर काहींना तोटा होणार आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक मंडळाने प्रचार सुरू ठेवला आहे.

शाळा सुटल्यानंतर तर काहींचा शाळेच्या वेळेत प्रचार सुरू आहे. सध्या मतदारांच्या गाठीभेटी नेते व उमेदवारांकडून सुरू आहेत. समाजमाध्यमावरील प्रचार सध्या गुरुजींकडून वेगाने सुरू आहे.

प्रत्येक जण आपल्या मंडळाने केलेली कामे मेसेजमधून सांगत आहे. तसेच, विरोधी मंडळावर संदेशातून टीका करण्याचे काम सुरू आहे. शाळेच्या वेळात सोशल मीडियावर टीका-टिप्पणीचा खेळ गुरुजींकडून खेळला जात आहे. याला राजकारणापासून अलिप्त असलेले गुरुजी मात्र वैतागले आहेत.

धोका होण्याची शक्यता

जिल्हा प्राथमिक बँकेची निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे. या स्थगितीच्या काळात मात्र मंडळाच्या नेत्यांसह उमेदवारांनी प्रचार सुरू ठेवला आहे. या काळातच धोका होण्याची शक्यता असल्याने हा प्रचाराचा जोर कायम धरला आहे.

‘विकास’भोवती फिरतेय निवडणूक

विकास मंडळाभोवतीच शिक्षक बँकेची निवडणूक फिरत आहे. विकास मंडळाच्या जागेचा विकास कसा करता येईल, यावर आता मंडळे बोलू लागली आहेत. त्याच जागेवरून आता निवडणूक चुरशीची होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT