Abhijeet patil-Uttam Jankar-Narayan Patil-Raju Khare-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : भाजपशी दोन हात करणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांना तुतारीचे आमदारच साथ देईनात; वसंतराव देशमुखांच्या उमेदवारीला विरोध

Solapur Vidhan Parishad Election 2026 : वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांमध्ये नाराजी असून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 06 June : विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठ्या हिम्मतीने दंड थोपटले आहेत. मात्र, पक्षाचे चारही आमदार हे मोहिते पाटील यांची साथ द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. कारण, वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीचा निर्णय आमच्याशी चर्चा करून घेतला नाही, असा दावा या आमदारांचा आहे, त्यामुळे भाजपशी दोन हात करायला निघालेले मोहिते पाटीलच कोंडीत सापडले आहेत.

विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख हे निवडणूक लढवत आहेत.

वास्तविक, महाविकास आघाडीत सोलापूरची जागा काँग्रेस पक्षाला सुटली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाला, त्यामुळे वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारी आघाडीकडून अंतिम करण्यात आली आहे. ती करताना खासदार मोहिते पाटील यांनी पक्षाच्या आमदारांना विश्वासात घेतली की नाही, याची चर्चा सध्या सुरू आहे.

वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीला माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी पहिल्यांदा जाहीरपणे विरोध दर्शविला. ‘मला विश्वासात न घेता वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीशी माझा काहीही संबंध नाही. पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीत देशमुख यांनी तीन महिन्यांपूर्वी भाजपला साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीशी आपला कोणताही संबंध नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

अभिजीत पाटील यांच्यानंतर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी तर थेट खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोहिते पाटील यांनी माझा आणि माझ्या पदाधिकाऱ्यांचा केसाने गळा कापला आहे. त्यामुळे माझा देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जानकर हे त्यांचा मुलगा जीवन जानकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र मोहिते पाटील यांनी देशमुख यांना पाठिंबा दर्शविला आहे.

करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे तर महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरायला हजेरी लावली होती. मी नाराज असलो तरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय ठरविण्यात येणार आहे. मात्र, देशमुख यांच्या उमेदवारीचा निर्णय आमच्याशी चर्चा करून घ्यायला हवा होता, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मोहोळचे आमदार राजू खरे तर गेल्या वर्ष ते सव्वावर्षापासून पक्षापासून अलिप्त आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा कोणताही मेसेज अद्याप आलेला नाही, असे म्हटले आहे. तसेच पक्षाच्या इतर आमदारांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

परिचारक समर्थकांना चुचकारण्याचा प्रयत्न

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी विरोधात सूर लावला असला तरी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जुळवाजुळवा करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली. तसेच, देशमुख यांनीही पांडुरंग कारखान्याच्या कार्यस्थळावरील माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन नाराज परिचारक समर्थकांना चुचकारण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT