Gangster Murder Mystery : दारू पार्टीत फुटलं हत्येचं गुपित! 5 महिन्यांपासून बेपत्ता कुख्यात गँगस्टरचा सांगाडा ड्रेनेज चेंबरमध्ये सापडला

Missing gangster Ravi Bidlan murder mystery solved after discussion accused liquor party exposed crime : नालासोपारा परिसरातील रवी बिडलान हा जानेवारी महिन्यापासून बेपत्ता होता. त्याच्या नातेवाइकांनी 26 जानेवारीला आचोळे पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
Gangster Murder Mystery
Gangster Murder MysterySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Gangster Murder : मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवणाऱ्या एका धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कुख्यात गँगस्टर रवी बिडलान याची हत्या करून त्याचा मृतदेह ड्रेनेज चेंबरमध्ये लपवून ठेवल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे आरोपींच्या दारू पार्टीत झालेल्या चर्चेमुळे या खुनाचा पर्दाफाश झाला.

नालासोपारा परिसरातील रवी बिडलान (वय 34) हा जानेवारी महिन्यापासून बेपत्ता होता. त्याच्या नातेवाइकांनी 26 जानेवारी रोजी आचोळे पोलिस (Police) ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र अनेक महिने तपास करूनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता.

दरम्यान, एका दारू पार्टीत रवी बिडलानच्या हत्येबाबत चर्चा झाल्याची माहिती त्याच्या पत्नीपर्यंत पोहोचली. आरोपींनी हत्या (Crime) कशी केली आणि मृतदेह कुठे लपवला याबाबत पार्टीत उघडपणे चर्चा झाल्याचे समजताच तिने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

Gangster Murder Mystery
Andekar gang in Ahilyanagar : पुण्यातील आंदेकर टोळीची थेट अहिल्यानगरात एंट्री? उद्योजकावर कोयत्याने हल्ला अन् गोळीबाराचा संशय? 5 जण अटकेत, पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त

या माहितीच्या आधारे आचोळे पोलिसांनी नालासोपाऱ्यातील वैतिवाडी परिसरात शोधमोहीम हाती घेतली. तपासादरम्यान एका ड्रेनेज चेंबरमध्ये मानवी सांगाडा आढळून आला. घटनास्थळी काही कपडेही सापडले असून ते रवी बिडलानचे असल्याची ओळख त्याच्या पत्नीने पटवून दिली.

Gangster Murder Mystery
Shiv Sena Leader Cheated : स्वस्त सोन्याच्या आमिषात अडकला शिंदे शिवसेना सदस्य; 52.80 लाखांची लूट, ऊसातून बाहेर आली टोळी, पुढे एकच थरार...

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, 15 जानेवारी रोजी रवी बिडलान याच्यावर दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ड्रेनेज चेंबरमध्ये टाकण्यात आला. सांगाडा रवीचाच असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी डीएनए आणि इतर वैज्ञानिक तपासणीनंतरच अंतिम पुष्टी होणार आहे.

पोलिसांकडून पाच जणांना अटक

या प्रकरणी आचोळे पोलिसांनी पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुमित आझाद सालासार उर्फ ‘बा’ याला अटक करण्यात आली असून रोहन संजय जगदाळे उर्फ ‘टायगर’ याच्यासह अन्य चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपींची गुन्हा केल्याची माहिती

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चौकशीदरम्यान हत्या करून मृतदेह ड्रेनेज चेंबरमध्ये टाकल्याची कबुली दिली आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण काय होते आणि या कटाचा मुख्य सूत्रधार कोण होता, याचा सखोल तपास सुरू आहे.

रवी बिडलान याची गुन्हेगारी पार्श्वभूमी

दरम्यान, रवी बिडलान हा पोलिसांच्या नोंदीतील सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, लूटमार, बलात्कार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि मारहाण यांसह डझनभर गंभीर गुन्हे दाखल होते. गेल्या वर्षी त्याला पाच जिल्ह्यांतून तडीपारही करण्यात आले होते.

मुंबई गुन्हेगारीचं विश्व...

दारूच्या पार्टीत रंगलेल्या चर्चेमुळे उघडकीस आलेल्या या हत्याकांडामुळे मुंबई आणि उपनगरांतील गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com