Ajit Pawar, Udayanraje bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha Election 2024 : अजित पवार सोडणार का बालेकिल्ल्यावरील हक्क..? साताऱ्याचा आज फैसला

Latest News on Maharashtra Lok Sabha Election Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सतारा मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. साताऱ्याचा आज होणार फैसला.

Umesh Bambare-Patil

Ajit Pawar NCP News : सातारा लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Election) वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. तिकीट मिळणारच म्हणून भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट प्रचाराची तयारी केली आहे. आज त्यांचे साताऱ्यात जंगी स्वागत होणार आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP) अद्याप या मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी आज राष्ट्रवादीची बैठक होत आहे. यामध्ये माढा, सातारा आणि नाशिकच्या (Nashik ) जागेबाबत आमदार व पदाधिकारी यांच्याशी बोलून अजित पवार (Ajit Pawar) निर्णय घेणार आहेत. सातारा व नाशिकच्या जागेची अदलाबदल करण्याबाबत ही निर्णय होण्याची शक्यता आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली असे सांगून खासदार उदयनराजे भोसले (Udaynraje Bhosale) व त्यांच्या समर्थकांनी आता प्रचाराची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी साताऱ्यात वॉर रूम तयार करण्यात आली आहे. तसेच आज साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचे जंगी स्वागत होणार आहे. यानंतर ते जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी आपली भूमिका मांडणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने (NCP) अद्यापही या मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. आजही अजित पवार हे सातारा मतदारसंघासाठी आग्रही आहेत. तसेच माढा मतदारसंघात ही अशीच परिस्थिती झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुण्यात होत आहे. या बैठकीत माढा, सातारा आणि नाशिक लोकसभेबाबत (Loksabha Election 2024) निर्णय होणार आहे. साताऱ्यातून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निवडणुकीची तयारी सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार या मतदारसंघावरील दावा सोडणार का, याकडे साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे लक्ष लागले आहे. सातारा व नाशिकची आदलाबदली केली जाणार असल्याचे ही सांगितले जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Everyone is paying attention to which party candidate will stand from Satara constituency for the upcoming Lok Sabha elections 2024)

सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला...

सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, 1999 पासून येथून राष्ट्रवादीचा खासदार निवडून येत आहे. येथील मतदारांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची पाठराखण केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हा बालेकिल्ला अबाधित राखण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यशस्वी होणार का, हे बघणे महत्त्वाचे आहे, अन्यथा ही जागा भाजपला सोडून बालेकिल्ल्यावरील आपला हक्क गमावणार याची उत्सुकता आहे.

Edited By: Rashmi Mane

R

SCROLL FOR NEXT