Solapur Lok Sabha Constituency : तिकीट जाहीर होताच सातपुते लागले कामाला; दोन देशमुखांनंतर घेतली राजन पाटलांची भेट

Loksabha Election 2024 : सोलापुरात सातपुते यांच्या प्रचाराची मुख्य मदार ही दोन देशमुखांच्या खांद्यावरच असणार आहे. तसेच, जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनाही पायाला भिंगरी बांधून फिरावे लागणार आहे.
Ram Satpute
Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 March : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर होताच भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते हे दुसऱ्याच दिवशी कामाला लागले आहेत. मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महायुतीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. सोलापुरात सातपुते यांच्या प्रचाराची मुख्य मदार ही दोन देशमुखांच्या खांद्यावरच असणार आहे. तसेच, जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनाही पायाला भिंगरी बांधून फिरावे लागणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापूर शहरात आलेल्या राम सातपुते (Ram Satpute) यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर राम सातपुते यांनी सोमवारी रात्री माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी निवडणुकीतील प्रचाराच्या रणनीतीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. आपण संपूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभे राहू, असे देशमुख यांनी आमदार सातपुते यांना सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Satpute
Dr. Bhagwat Karad-Chandrakant Khaire : रंगात रंगले संभाजीनगरचे संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयालाही राम सातपुते यांनी भेट दिली. त्या ठिकाणी शिवसेनेचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सातपुते यांचे स्वागत केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभे राहील. महायुतीमध्ये एकत्रित काम करण्याचा निर्धार या वेळी अमोल शिंदे यांनी बोलून दाखवला.

माजी सहकारमंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या बंगल्यावर जाऊन सातपुते यांनी त्यांची भेट घेतली. आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी आमदार देशमुख यांच्यासोबत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन आणि इतर गोष्टींबाबत सातपुते यांनी चर्चा केली. देशमुख यांनीही विजयासाठी सातपुते यांना शुभेच्छा दिल्या.

Ram Satpute
Mahayuti News : मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यातून निंबाळकरांच्या प्रचाराचा नारळ फुटणार

सोलापूर शहरातील शिवसेना-भाजप युतीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आमदार राम सातपुते यांनी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्या ठिकाणी माजी आमदार पाटील आणि त्यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी आमदार सातपुते यांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीत मी आणि आमचे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा शब्द माजी आमदार राजन पाटील यांनी सातपुते यांना अनगरच्या भेटीत दिला.

आमदार राम सातपुते यांनी लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर होताच दुसऱ्या दिवशी नेत्यांच्या भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. पुढच्या काळात प्रचाराचा हा टेम्पो कशा पद्धतीने टिकवून ठेवतात, यावर सातपुते यांचे निवडणुकीतील यशापयश अवलंबून राहणार आहे.

R

Ram Satpute
NCP MLA Meeting : माढ्याचा तिढा अजितदादा सोडवणार; रामराजेंसह राष्ट्रवादी आमदारांची बोलावली बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com