Kolhapur Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : मंडलिक गटानं गावगाड्यातील वातावरण तापवलं, मुश्रीफ-घाटगे गटाविरोधात बॅनरबाजी

Kolhapur Politics Mahayuti News : महायुतीकडून आपल्याला उमेदवारी द्यावी आणि आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी थांबावे असं जाहीर आव्हान देत वीरेंद्र मंडलिक यांनी महाविकास आघाडीसह महायुतीचे संभाव्य उमेदवारांना टक्कर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 09 Oct : कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल विधानसभा मतदारसंघातील लढत अधिक लक्षवेधी होताना दिसत आहे. मतदारसंघातील राजकीय डावपेच दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत.

अशातच आता महायुतीचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या विरोधात मेळावा घेत उमेदवारीवर दावा केला.

महायुतीकडून आपल्याला उमेदवारी द्यावी आणि आता पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी थांबावे असं जाहीर आव्हान देत वीरेंद्र मंडलिक यांनी महाविकास आघाडीसह महायुतीचे संभाव्य उमेदवारांना टक्कर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मंगळवारी मेळावा पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांसह वीरेंद्र मंडलिक (Virendra Mandalik) यांनी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारापेक्षा महायुतीचेच उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर रोष असल्याचे दाखवून दिले. मंडलिक यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर गावागावातील मंडलिक प्रेमी आता मुश्रीफ आणि घाटगे यांच्या विरोधात उघड उघड रस्त्यावर उतरलेले आहेत.

कागल (Kagal) विधानसभा मतदारसंघातील गाव गाड्यावरील वातावरण आतापासून तापायला सुरुवात झाली आहे. कागल विधानसभा मतदारसंघातील गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट पालकमंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे.

काय काय केलंय तुम्ही? हे विसरणार नाही आम्ही

हसन साहेब..., समरजितराजे काय काय केलंय तुम्ही? हे विसरणार नाही आम्ही. अशी बॅनरबाजी करत थेट आव्हान दिलं आहे. येणारे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडलिक गटाकडून दबाव तंत्र वापरले जात आहे. या बॅनरबाजीमुळे विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT