Assembly Election : मनोज जरांगेंना नडलेल्या अपक्ष आमदाराला भाजपकडून तिकीट? स्वत:च जाहीर केली उमेदवारी

Assembly Election barshi constituency Rajendra Raut manoj jarange patil: राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील हे सुपाऱ्या घेतली असून ते रोहित पवार, राजेश टोपे यांचे बाहुले असल्याची टीका केली होती.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते. त्यांच्या या आंदोलनात त्यांनी प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. त्याविरोधात पत्रकार परिषद घेत विधानसभेतील बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी तिखट शब्दांत मनोज जरागेंवर टीका करत त्यांना आव्हान दिले होते.

जरांगेंवर टीका करणाऱ्या अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी ते विधानसभा निवडणूक भाजपकडून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचे राजेंद्र राऊत म्हणाले.

राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील हे सुपाऱ्या घेतली असून ते रोहित पवार, राजेश टोपे यांचे बाहुले असल्याची टीका केली होती. तसेच आपल्यासमोर उदयनराजे भोसले यांच्याबद्दल जरांगेंनी अपशब्द वापरला होता, असा आरोप देखील राऊत यांनी केला होता.

मनोज जरांगे यांनी राजेंद्र राऊत यांना इशारा देत म्हटले होते की, 'मराठ्यांना ओबीसीतून महायुतीने आरक्षण दिले तर मी काहीच बोलणार नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्याकडून तसं लिहून आणा. अन्यथा मराठे पाडतील.'

Manoj Jarange Patil
Mahayuti News : सुपडासाफ, पाडापाडीच्या भाषेला महायुतीत आता ब्रेक लागणार का ?

राऊत विरुद्ध सोपल

2019 ला राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांचा पराभव केला होता. यंदा दिलीप सोपल हे महाविकास आघाडीकडीकडून बार्शी विधानसभा लढण्याची शक्यता आहे. दिलीप सोपल हे शिवसेनेकडून 2019 ची निवडणूक लढले होते.

शरद पवार हे बार्शीत आल्यानंतर त्यांच्या सभेनंतर ते सोपल यांच्या घरी गेले होते. त्यानंतर सोपल हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली. सोपल हे शिवसेना (यूबीटी) की शरद पवारांच्या पक्षातून लढणार हे अजून स्पष्ट नसले तरी तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत.

Manoj Jarange Patil
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदेंचा प्रत्येक शाब्दिक वार आमदार पवारांच्या जिव्हारी लागेल असाच; नेमकं काय भाषण केलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com