Nitin Patil/Satara  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पैशांच्या बेमाप वापरामुळे माणच्या राजकारणाची प्रतिमा मलीन होतेय- नितीन पाटील

Satara Politics| Bank| चांगल्या विचारांची जपणूक करत तालुक्यातले हे चित्र बदलण्याची गरज

सरकारनामा ब्युरो

सातारा : पैशांच्या (Money) बेमाप वापरामुळे या माण तालुक्याची (Maan Taluka) ओळख मलीन झाली आहे. पैशांसाठी राजकारण (Politics) सुरु आहे. ज्यामुळे यशवंतराव चव्हाणांचे विचार मागे पडले आहेत. याचीच चर्चा जिल्हाभर सुरु असल्याचे सातारा जि.म.बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी म्हटले आहे.माण बिजवडी येथील श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.दहिवडी शाखा बिजवडीच्या नूतनीकरण उदघाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. (satara latest political news)

अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले ,पैशांवरील राजकारण लोकशाहीला घातक असून हे तालुक्याच्या दृष्टीने चांगले नाही. कुठेतरी चुकततयं हे लक्षात घेऊन चांगल्या लोकांनी एकत्र येऊन हे थांबवणं गरजेचे आहे. चांगल्या विचारांची जपणूक करत तालुक्यातले हे चित्र बदलण्याची गरज असून तुम्ही सर्व जाणकार मंडळींनी एकत्र येत चांगली संस्कृती निर्माण करावी.चांगल्या सुसंस्कृत व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहत पैशांच्या राजकारणामुळे तालुक्याचे खराब झालेले नाव बदलवून जिल्ह्यात सुसंस्कृत तालुका म्हणून पुर्नओळख निर्माण करावी असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्रभाकर देशमुख ,अनिल देसाई , एम.के.भोसले ,सुनिल पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, सातारा जि.बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक रामभाऊ लेंभे, सातारा पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन प्रकाश पाटील, सुरेश साळुंखे, श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनिल पोळ, व्हा.चेअरमन सुरेश इंगळे, राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम.के.भोसले, जेष्ठ पत्रकार बापूराव गुंजवटे, शिवाजीराव भोसले, अँड.कुंडलिक भोसले, जनार्दन भोसले ,शंकर जाधव ,दादासो भोसले संदीप भोसले आदी प्रमुख मान्यवर सिध्दनाथ पतसंस्थेचे पदाधिकारी , सभासद ,सेवकवर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT