Solapur Crime news
Solapur Crime news  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आधी अपघाताचा बनाव; मग केली ४० लाखांची चोरी

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने करमाळा (Karmala) येथे 40 लाखाची विदेशी दारु जप्त केली आहे. मद्य वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अपघात झाल्याचा बनाव रचून ठोक विक्रेता आणि वाहन चालकाने 40 लाखाचा माल चोरला होता. अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील घोडेगाव येथे ती दारू विकण्यात आली. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने ट्रकचालकासह दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी दारू विकत घेणारा व ट्रकमालक फरार आहे. ( Solapur Crime news)

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारीला नाशिकमधील मे. युनायटेड स्पिरीट लिमिटेड या कारखान्यातून विदेशी मद्याच्या 1000 बॉक्सचा साठा सोलापूरला पाठवण्यात आला होता. ट्रकमधून सोलापूर जिल्ह्यातील मे. अरतानी ट्रेडर्स यांना पोहोचवण्यात येणार होता. मात्र चालक आणि ठोक विक्रेत्याने 25 फेब्रुवारीला ट्रक करमाळ्यात पोहचताच ट्रकला रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाल्याचा बनाव केला.

पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रकची तसेच घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी 1000 मद्याच्या बॉक्सपैकी केवळ 398 बॉक्स व 5 बाटल्या सुस्थितीत तर 7 बॉक्स फुटलेल्या स्थितीत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे पथकाला संशय आला. चौकशीदरम्यान ट्रकचालक जहिर अत्तारला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने ट्रकमधील 595 बॉक्स दारू अवैधरीत्या विकल्याचे कबूल केले.

याप्रकरणी ट्र्रकचालक जहिर रफिक अत्तार (वय 49, रा. नाशिक) आणि विष्णु मधुकर डमाळे (वय 42, रा. ईमामशाही, कोळीवाडा, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहेत. तर अवैधरित्या दारू विकत घेणारा दामू जाधव (रा. घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) आणि ट्रकमालक गुलाम महंमद अन्सारी (रा. नाशिक) हे दोघे फरार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT