Nitesh Rane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitesh Rane : विशाळगडावर ऊरूस होऊ देणार नाही; मंत्री नीतेश राणेंच्या इशाऱ्यानं खळबळ

BJP Minister Nitesh Rane warning urus Kolhapur Vishalgad : हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक असलेले भाजप आमदार मंत्री नीतेश राणे यांनी विशाळगडावरील ऊरूस कार्यक्रमाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : हिंसाचारानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर विशाळगड आता पर्यटकांसाठी नियमांसह खुला झाला आहे.

परंतु तिथं आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांवरून भाजप मंत्री नीतेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. हा कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा मंत्री राणे यांनी दिला आहे.

विशाळगडावर 12 जानेवारीला ऊरूस आयोजित केला आहे. तसे संदेश व्हायरल झाले आहे. याची माहिती मिळताच, भाजप (BJP) मंत्री नीतेश राणे यांनी आक्रमक होत ऊरूस होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.

सहा महिन्यांपूर्वी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून विशाळगडावर जाळपोळीची घटना घडली होती. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घरं आणि दुकानांची जाळपोळ केली. याप्रकरणी पोलिसांनी (Police) संभाजीराजे छत्रपतींसह यांनी 'चलो विशाळगड', अशी हाक दिली होती. तिथं 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेला आता जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. गडावर पर्यटक नसल्यानं सहा महिन्यानंतरही विशाळगडावरील व्यवहार ठप्प आहेत. आता मात्र स्थानिक प्रशासनानं काही अटी, नियम घालून विशाळगड पर्यकटांसाठी खुला करण्यात आला आहे.

परंतु 12 जानेवारीला तिथं ऊरूसाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावर मंत्री नीतेश राणे यांनी हा ऊरूस होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. मंत्री राणे यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा कोल्हापूरमधील वातावरण तापायला सुरवात झाली आहे. नीतेश राणे यांच्या या इशाऱ्यानंतर स्थानिक प्रशासन अलर्ट झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT