Santosh Deshmukh Murder Case : जनआक्रोश मोर्चात आमदार सुरेश धस यांना 'नो एन्ट्री'; 'मोठं' कारण आलं समोर

BJP MLA Suresh Dhas Jalna protest killing Beed Santosh Deshmukh : बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या निषेधासाठी जालना इथं निघत असलेल्या मोर्चा भाजप आमदार सुरेश धस सहभागी होणार नाहीत.
Suresh Dhas 2
Suresh Dhas 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालना इथं निघत असलेल्या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

आमदार धस यांच्या सहभागावर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काही आक्षेप घेतले आहेत. त्यातून ते सहभागी होणार नाहीत, असे सांगितले जात आहे. जालना इथं मोर्चा सुरू झाला असून, त्यात मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे सहभागी झाले आहेत.

जालना इथं मराठा समाजाकडून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या निषेधासाठी, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. या मोर्चात भाजप (BJP) आमदार सुरेश धस सहभागी होणार नाहीत. या मोर्चासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काही अटी घातल्या आहेत. त्यामुळेच आमदार धस या मोर्चात सहभागी झाले नाहीत. आमदार धस हे सध्या बीडमध्येच आहेत.

Suresh Dhas 2
Dinvishesh 10 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

मराठा (Maratha) क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जनआक्रोश मोर्चामध्ये राजकीय टीका करू नये, कोणाच्या जातीविरोधात बोलू नये, एखाद्याला टार्गेट करून नये, समाजाला टार्गेट करू नये, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यावर बोलावे, अशा सूचना केल्या आहेत. तसेच फरार आरोपींना अटक व्हावी, याची मागणी करावी. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी लढावे, कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी एक कोटी रुपयांची मागणी लावून धरावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

Suresh Dhas 2
What is E-Cabinet : मुख्यमंत्री फडणवीसांची 'ई-कॅबिनेट' काय आहे? का घेतला निर्णय?

मोर्चा म्हणजे, शोकसभा आहे

तसेच कुटुंबांतील एकाला सरकारी नोकरीत समावेश करून घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. हा मोर्चा म्हणजे, एक शोकसभा आहे. इथं टाळ्या, शिट्या नको आहेत. न्याय हवा आहे, यासाठी हा मोर्चा आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मंत्री बावनकुळेंकडून धस यांची कानटोचणी

मराठा क्रांती मोर्चाच्या या नियमांमुळे भाजप आमदार सुरेश धस जालना इथल्या मोर्चात सहभागी झालेले नाहीत, असे सांगितले जात आहे. तसेच भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आमदार धस यांना याप्रकरणात राजकारण नको, अशी वारंवार कानटोचणी केलेली आहे. तसंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सरकार गंभीर्याने लक्ष ठेवून आहेत. आरोपींना शिक्षा होईपर्यंत काय निर्णय घ्यायचे, ते सरकार घेईल. इथं राजकारण नको. वेगवेगळ्या विधानांमुळे गंभीर मुद्याला वेगळं वळण लागतं, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com