Kolhapur Municipal Corporation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Swikrut Nagarsevak : स्वीकृत सदस्य नियुक्तीत राजकीय हस्तक्षेप, निवडही आधीच ठरली? तज्ज्ञांची नियुक्ती बस्नात...

Municipal corporations appoint : राज्यात राज्यपालनियुक्त आमदार आणि देशात राष्ट्रपतीनियुक्त खासदारांप्रमाणेच महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य नियुक्ती केली जाते.

Aslam Shanedivan

  • महापालिकेत दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य अशी रचना आहे.

  • या पदांचा उद्देश तज्ज्ञांच्या मदतीने पारदर्शक कारभार करणे हा आहे.

  • मात्र, प्रत्यक्षात राजकीय पक्षांकडून कारभारी व्यक्तींना संधी देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

Kolhapur News : महानगरपालिकेत यावेळी आठ स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये कारभाऱ्यांना संधी मिळणार की, तज्ज्ञांना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक, सामाजिक अशा वेगवगेळ्या क्षेत्रांतील येथे स्वीकृत सदस्य निवडावा, असा नियम आहे. निवृत्त प्राध्यापक, महापालिकेतील निवृत्त उपायुक्त, वकील, सी. एस., अभियंता, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशांची येथे नियुक्ती करणे अपेक्षित असते.

राज्यात राज्यपालनियुक्त आमदार आणि देशात राष्ट्रपतीनियुक्त खासदार असतात. त्यांच्या निवडीवेळी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांना येथे संधी दिली जाते. याच पद्धतीने महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य नियुक्त होतात. दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य अशी संख्या आता महापालिकेत असणार आहे. दहापेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत. यामध्ये कोणाला संधी द्यायची, हे यापूर्वीच ठरल्याचेही सांगण्यात येते.

महापालिकेला पारदर्शी कारभार करण्यासाठी तज्ज्ञांकडून मदत व्हावी. त्यांच्याकडून त्यांच्या क्षेत्रातील अनुभव येथे उपयोगात यावा, यासाठी हे पद असते. मात्र, तेथे कारभारी व्यक्तींना संधी देण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो. बाहेरून पक्षाचे काम करणाऱ्यांना आणि नेत्यांच्या हक्काच्या व्यक्तींना या ठिकाणी संधी दिली जाते. नव्या, तज्ज्ञ चेहऱ्यांना संधी देणे शक्य.

२०२६ च्या सभागृहात आठ स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. त्यापैकी शिवसेनेचे स्वीकृत निकालापूर्वीच ठरले आहेत. निवडणुकीत नेत्यांनी त्यांना शब्द दिला आहे. महापालिकेत यापूर्वी सत्तेत आणि पदावर असलेल्यांच्या घरातील एकाला संधी दिली जाणार आहे. बॅक ऑफिस पाहणाऱ्या एका माजी नगरसेवकाला संधी मिळू शकते.

काँग्रेसकडून पराभूत झालेल्या एकाही नगरसेवकाला संधी दिली जाणार नाही. ज्या ठिकाणी पक्षाचे राजकीय वजन कमी आहे, त्या ठिकाणी कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक करण्याचे धोरण काँग्रेसचे असल्याचे सांगण्यात येते. भाजपकडूनही काही नावांवर चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांनीही अद्याप कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केले नाही. त्यामुळे सर्वच पक्षांना नव्या आणि तज्ज्ञांच्या चेहऱ्यांना संधी देता येणे शक्य आहे. त्यामुळे ‘कारभारी’ या टोपण नावाने सुद्धा त्यांची ओळख गडद होते.

हे होते स्वीकृत

२०१०-२०१५

प्रा. जयंत पाटील

उत्तम कोराणे

विनय फाळके

उदय जाधव

शशिकांत पाटील

२०१५-२०

तौफिक मुल्लाणी

मोहन सालपे

जयंत पाटील

किरण नकाते

सुनील कदम

FAQs :

1) स्वीकृत सदस्यांची नियुक्ती का केली जाते?
महापालिकेच्या कारभारात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा अनुभव वापरण्यासाठी स्वीकृत सदस्य नियुक्त केले जातात.

2) स्वीकृत सदस्यांची संख्या किती असते?
दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य असतो, मात्र एकूण संख्या दहापेक्षा जास्त नसते.

3) स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो का?
नाही, स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो.

4) कोणत्या क्षेत्रांतील व्यक्तींना प्राधान्य दिले जाते?
शिक्षण, कायदा, अभियांत्रिकी, लेखाशास्त्र, समाजकार्य, प्रशासन अशा क्षेत्रांतील तज्ज्ञांना.

5) स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवर वाद का होतो?
तज्ज्ञांऐवजी राजकीय निष्ठा पाहून नियुक्त्या झाल्याचा आरोप होत असल्यामुळे वाद निर्माण होतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT