Kolhapur Political War : महाडिकांना इंगा दाखवणार? सतेज पाटलांचा महापौरपदाचा ‘फर्स्ट लूक’; कोल्हापुरात काँग्रेस-शिवसेनेची खलबतं

Satej Patil vs dhananjay mahadik Kolhapur Mahapalika Election : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीने विजय मिळवला आहे.
Dhananjay Mahadik, Satej Patil
Dhananjay Mahadik, Satej PatilSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अनेक दशकांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात यंदा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

  2. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र बहुमत मिळवू शकला नाही.

  3. आता कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) युती होण्याची शक्यता चर्चेत आहे.

Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेवर गेल्या दशकाची काँग्रेसची सत्ता महायुतीने खालसा केली आहे. पण आता येथे महायुतीचा पहिला महापौर कोणाचा यावरून जुंपण्याची शक्यता आहे. महायुतीत सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या असून आपलाच महापौर असेल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठणकावले असून तसेच काहीसे खासदार धनंजय महाडिकही दावा करताना दिसत आहे. यावेळी ते काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे तोंड सूखही घेताना दिसत असतात.

पण आता हातातून सत्ता गेल्यानंतरही सतेज पाटील पुन्हा महाडिकांना धोबीपछाड देण्याच्या तयारीत दिसत आहे. एकटे लढूनही सतेज पाटल यांनी एक हाती काँग्रेसचे ३५ नगरसेवक निवडून आणत भाजपसह महायुती आणि खासकरून महाडिकांना धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची साथ घेण्याच्या पडद्यामागे हाचलाची सुरू असल्याचे कळत आहे. असे झाल्यास स्पष्ट बहुमत असणाऱ्या महायुतीला मात्र सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. तर महापौर भाजपचा व्हावा असे स्वप्न पाहणाऱ्या महाडिकांना देखील धक्का बसणार आहे.

मागील दहा वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला नुकताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुंग लागला असून महायुतीने प्रथमच महापालिकेवर झेंडा फडकावला आहे. भाजपला २६, शिंदेंची शिवसेना १५ आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जागा मिळाल्या असून सत्तेसाठी आवश्यक असणारी ४१ ही मॅजिक फिगरही महायुतीने ओलांडली आहे. महायुतीकडे ४५ नगर सेवकांचे स्पष्ट बहुमत आहे. मात्र, शिवसेनेचा विजयातील मोठा वाटाच आता भाजपसाठी अडचण ठरण्याची शक्यता आहे.

Dhananjay Mahadik, Satej Patil
Kolhapur Politics : महायुतीचे मिशन 'टार्गेट बंटी पाटील'; धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर तुटून पडले, मुश्रीफांनी अंग काढले?

काँग्रेसने ३४ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनण्याचा बहुमान मिळवला असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १ जागा मिळाली आहे. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांचा आकडा ३६ झाला आहे. यामुळे काँग्रेस विरोधी बाकावर असणार यात शंका नाही. यावरून सध्या महायुतीचे नेते सतेज पाटील यांना टार्गेट करताना दिसत आहे.

पण आता शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला साथ दिली तर कोल्हापुरातील सगळं चित्र बदलू वेगळं असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पडद्यामागे जोरदार राजकीय घडामोडी सुरू असून सगळ्याच गोष्टी आपण जाहीर करू शकत नाही, असे सूचक वक्तव्य सतेज पाटील यांनी केल्याने भाजपच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे.

यावेळी सतेज पाटील यांनी, पडद्यामागं नेमकं काय सुरू आहे. याची खुली चर्चा करता येत नाही, असे म्हणतं अधिक बोलणं टाळलं आहे. तर काँग्रेस (३४) आणि शिंदेंची शिवसेना (१५) एकत्र आल्यास कोल्हापुरात सत्ता स्थापन होवू याकडे त्यांनी लक्ष वेधल्याचेही समोर येत आहे. जर असे झाल्यास भाजपचा कंडका पडू शकतो. तसेच सतेज पाटील हे पुन्हा महाडिकांना धोबीपछाड देऊ शकतात अशी खमंग चर्चा रंगली आहे.

Dhananjay Mahadik, Satej Patil
Kolhapur Politics : 'सत्ता असताना भरलं खिसं, आता म्हणताय कोल्हापूर कस्सं...' काँग्रेसच्या टॅगलाईनला महायुतीचं जशास तसं प्रत्युत्तर

FAQs :

1) कोल्हापुरात कोणाला बहुमत मिळाले आहे?
कोल्हापुरात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

2) काँग्रेसची कामगिरी कशी राहिली?
सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, पण बहुमतापासून दूर राहिला.

3) कोल्हापूर काँग्रेसचा बालेकिल्ला का मानला जात होता?
मागील अनेक दशकांपासून कोल्हापुरात काँग्रेसची सत्ता व प्रभाव होता.

4) काँग्रेस–शिंदे सेना युतीची चर्चा का सुरू आहे?
राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि सत्तास्थापनेसाठी पर्यायी पर्याय शोधले जात आहेत.

5) या संभाव्य युतीचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
अशी युती झाल्यास कोल्हापुरातील सत्तेचे गणित पूर्णपणे बदलू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com