Karad Muncipalty sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Palika : पाणीपट्टीवरून कराडला काँग्रेसमध्ये दुफळी; ज्येष्ठांचा सवतासुभा

Karad कराड पालिकेची चोवीस तास पाणी योजनेची वर्कऑर्डर २००९ ला मिळाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

- सचिन शिंदे

Karad Palika News : पालिकेने लागू केलेल्या मीटरप्रमाणे पाणीपट्टीला क़ाँग्रेसच्या Congress पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून तीस टक्क्यांपेक्षा जास्त सूट देण्याची मागणी केलेली असतानाच क़ाँग्रेसअंतर्गत काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे collector धाव घेत कैफियत मांडली आहे. क़ाँग्रेसअंतर्गत मोठ्या गटाने मांडलेल्या सवतासुभ्याने पक्षांतर्गत दुफळी स्पष्ट झाली आहे.

वेदन देण्यासाठी क़ाँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अप्पा ऊर्फ राजेंद्र माने, माजी नगरसेवक इंद्रजित गुजर, फारुक पटवेकर, संजय शिंदे, क़ाँग्रेसचे पदाधिकारी अमित जाधव उपस्थित होते. जिल्हाधिकारी रूपेश राजवंशी यांना त्यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, की पालिकेची चोवीस तास पाणी योजनेची वर्कऑर्डर २००९ ला मिळाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सद्यःस्थितीमध्ये योजना अजून पूर्ण नाही.

चोवीस तास पाणी योजनेसाठी पालिकेने मीटर बसविण्यास प्रत्येक कनेक्शनसाठी दोन हजार रुपयांची आकारणी केली आहे. अद्याप योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. शहरात सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी एक तास पाणीपुरवठा केला जात आहे. तो त्याच पद्धतीने सुरू ठेवावा. सध्या पाणीपुरवठा होताना पहिली १५ मिनिटे नळातून फक्त हवाच येते.

घरात केवळ तीन व्यक्ती राहात असूनही त्यांची तिमाही बिल अवाजवी व भरमसाट दिली आहेत. योजना व बिलाबाबत नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे शहरात विविध जनआंदोलन झाली. यावर मुख्याधिकारी यांनी पाणीबिलात १५ टक्के सूट देण्याचे मान्य केले; परंतु आमच्या मागणीनुसार चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या बिलाची आकारणी पूर्वीप्रमाणेच म्हणजे मीटर नसताना केली जात होती. त्या पद्धतीने किंवा सध्याच्या बिलात ३० टक्के सूट देऊन करावी. असे न झाल्यास आम्हास सर्व पक्षीय व्यापक जनआंदोलन करावे लागेल. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची सखोल चौकशी होऊन झालेल्या पाणीबिल आकारणीबाबत योग्य तोडगा आपल्यामार्फत निघावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT