Karad : लव्ह जिहादच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य मोर्चा...

RajaBhaiyya तेलंगणाचे आमदार राजाभैया यांनी मोर्चेकरांना संबोधताना म्हणाले, हिंदू एकवटला तर दुसरी श्रद्धा वालकर होणार नाही. सरकारने आजच्या मोर्चाची दखल घेऊन लव्ह जिहादविरोधी कायदा त्वरित करावा
Karad Love Jihad protest march
Karad Love Jihad protest marchsarkarnama

Karad News : लव्ह जिहादला Love Jihad विरोध, गोहत्या बंदी व धर्मांतरासह समान नागरी कायद्यासाठी आज कराडला Karad हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू गर्जना मोर्चा काढला. तेलंगणाचे आमदार राजाभैया Rajabhaiyya यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हातात भगवे झेंडे व भगव्या टोप्या घालून महिला व पुरुष सहभागी झाले होते. सकाळी अकराच्या सुमारास पांढरीच्या मंदिरापासून मोर्चास सुरूवात झाली.

देशात सध्या लव्ह जिहादची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये हिंदू मुलींना लक्ष बनवून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. तसेच गोहत्या बंदी कायदा असूनही त्याचा त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी केली जात नाही. देशात जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहेत. विरोधात राज्यभर सकल हिंदू समाजाकडून हिंदू गर्जना मोर्चा काढला जात आहे. आज कराडला पांढरीच्या मारुती मंदिर येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत हिंदू गर्जना मोर्चा काढला.

सकाळी अकराच्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली. मोर्चाच्या सुरुवातीला भगवा ध्वज, भगवी पताका व भगव्या टोप्या घातलेल्या महिला, त्यानंतर युवक व विविध संघटनेचे कार्यकर्ते सामील झाले होते. त्यांच्या हातात आतंकवादी विचाराचा अफजल फाडलाच पाहिजे, धर्मांतर थांबले पाहिजे, अफजल विचाराच्या देशद्रोहांना देशबाहेर काढावे, त्यांना देशद्रोही घोषित करून फाशीवर लटकवावे यासह देशात समान नागरी कायदा झालाच पाहिजे आदीसह विविध मागण्याचे फलक होते.

Karad Love Jihad protest march
Karad : काश्मीरमध्ये कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना मिठ्या मारणे हा बाळासाहेबांचा अपमानच... दीपक केसरकर

मोर्चा पांढरीचा मारुती मार्गे जोतिबा मंदिर, कन्या शाळा समोरून मुख्य बाजारपेठे मार्गे चावडी चौक, नेहरू चौक, आझाद चौक व तेथुन दत्त चौकात आला. तेथे युवतींची व मान्यवरांची मनोगते व्यक्त केली. त्यानंतर तेलंगणाचे आमदार राजाभैया यांनी मोर्चेकरांना संबोधताना म्हणाले, हिंदू एकवटला तर दुसरी श्रद्धा वालकर होणार नाही. सरकारने आजच्या मोर्चाची दखल घेऊन लव्ह जिहादविरोधी कायदा त्वरित करावा. महाविद्यालये, शिकवण्यांसमोर मुलींना हेरण्यासाठी विशिष्ट धर्मीय मुले थांबणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

Karad Love Jihad protest march
PM Modi Education: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षण किती ? जाणून घ्या...

भाषणानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर शपथ घेऊन मोर्चाची सांगता झाली. मोर्चाचे नेतृत्व तेलंगणाचे आमदार राजाभैया यांनी केले. यावेळी भाजपचे सचिव विक्रम पावसकर, लोकसभा मतदार संघाचे प्रभारी अतुल भोसले, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी आदींसह भाजपचे पदाधिकारी, शिवसेना(शिंदे गट), हिंदू एकता आंदोलन, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदींचे कार्यकर्ते सहभागी झाले.

Karad Love Jihad protest march
Karad : अजित पवारांवर काकांचाच विश्वास नाही; जनता कशी विश्वास ठेवणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com