Mahesh Kote Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP News : भविष्यात दाऊदला भाजपत घेतलं तरी फडणवीस त्याचं स्वागत करतील : महेश कोठेंची टीका

Mahesh Kote Statement : भाजपवाले सत्तेच्या मस्तीने लोकांना दाबण्याचं काम करत आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur News : भारतीय जनता पक्षात सध्या कोणालाही घ्यायचं काम चालू आहे. भविष्यात दाऊद इब्राहिमला पक्षात घेतलं, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं स्वागत करतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते, माजी महापौर महेश कोठे यांनी केले आहे. (Fadnavis will welcome Dawood in BJP in future: Mahesh Kote)

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात बोलताना माजी महापौर कोठे यांनी फडणवीस यांच्याबद्दल हे उद्‌गार काढले आहेत.

महेश कोठे म्हणाले की, महात्मा गांधींजीचे वडील कोण होते, हे त्यांनी तपासण्यास सुरुवात केली आहे. ज्या राष्ट्रपित्यामुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ज्यांनी आपल्याला अहिंसेचा मार्ग दाखविला, त्यामुळं ब्रिटिशांना हा देश सोडून जावं लागलं, हा इतिहास असताना त्याच महामानवाला बदनाम करण्याचं काम केलं जातं.

भाजपवाल्यांना सत्ता मिळाली आहे आणि सत्तेच्या मस्तीने हे लोकांना दाबण्याचं काम करत आहेत, असाही आरोप महेश कोठे यांनी जाहीर सभेतून भाजपवर केला आहे.

दरम्यान, महेश कोठे हे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तशी तयारी त्यांनी मतदारसंघात चालवली आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जातात. पक्षाने त्यांना तिकीट दिल्यास शहर उत्तर मतदारसंघात तुल्यबळ लढत होऊ शकते. माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. कोठे यांच्याकडूनही पक्षाला मोठ्या अपेक्षा आहेत, त्यामुळे तेही निवडणुकीत मोठी ताकद पणाला लावतील, अशी चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT