Ajit Pawar CM News : भाजप मंत्र्याने उडवली अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची खिल्ली...

BJP Minister Statement : अजितदादांबद्दल उल्लेख केला, पण तो क्लीअर कधी केलेला नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भविष्यात अजितदादांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू’ असे म्हटले आहे. आता भविष्य कधीही असू शकतं, १० वर्षांनी...२० वर्षांनी अन्‌ २५ वर्षांनी असू शकतं, अशा शब्दांत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काहींशी खिल्ली उडविणारे वक्तव्य केले आहे. (BJP Minister mocks Ajit Pawar's Chief Ministership....)

मंत्री सावे म्हणाले की, मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे. त्याचबरोबर अजितदादांबद्दल उल्लेख केला, पण तो क्लीअर कधी केलेला नाही. त्यांना मुख्यमंत्री कधी करतील, हे लिहिलेले नाही. भविष्यात असं म्हटलं आहे. भविष्य कधीही असू शकतं. दहा वर्षांनी, वीस वर्षे आणि २५ वर्षांनीही असू शकतं.

Ajit Pawar
Bawankule Statement : आम्हालाही वाटतं फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; पण..., भाजपच्या बावनकुळेंचे विधान

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांकडील सुनावणीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी अपात्र ठरतील आणि त्यानंतर अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी चर्चा रंगत असते. मात्र, त्यावर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. अजित पवार यांना तशी माहिती देण्यात आलेली आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत राज्यात चर्चा सुरूच आहे. अजित पवार गटाकडूनही दादा मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे वेगवेगळ्या देवांना घातले जाते. त्यावर अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलेले आहे. तशी चर्चा कोणीही करू नये. ज्यांच्याकडे १४४ पेक्षा जास्त आमदार आहेत, तो मुख्यमंत्री होईल, असे वेळोवेळी स्पष्ट केले होते.

Ajit Pawar
Ajit Pawar News : अजितदादांनी भाजपश्रेष्ठींसमोर जाणं पुन्हा टाळलं; जीएसटी काउन्सिलसाठी केसरकर दिल्लीला रवाना

याचसंदर्भाने गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अजित पवार हे २०-२५ वर्षांनी मुख्यमंत्री होतील, असे विधान केले आहे. त्याची चर्चा आता रंगली आहे.

Ajit Pawar
Hasan Mushrif On Satej Patil : मुश्रीफांचा सतेज पाटलांना कडक इशारा; म्हणाले, 'मैत्री मैत्रीच्या ठिकाणी अन् राजकारण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com