dattatray pansare
dattatray pansare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांत राजकीय नेत्यांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. संगमनेरमध्ये भाजप नेत्याची चार वाहने पेटवून देण्याची घटना घडून दोन दिवस होत नाहीत तोच श्रीगोंद्यातील एका मोठ्या राजकीय नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांच्यावर घारगाव (ता. श्रीगोंदे) येथे जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात पानसरे यांच्यासह दोघे यात जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार चालू आहेत.

दरम्यान या मारामारीत पानसरे पती, पत्नीविरुद्धही समोरच्या व्यक्तींनी गुन्हा दाखल केला आहे. बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव येथे रस्त्याच्या वादातून पानसरे व परदेशी या दोन्ही कुटुंबात वाद सुरू होते. या वादाचे रुपांतर रविवारी ( ता. 26 ) मारामारी झाले. यात परदेशी कुटुंबाने रिवाल्वर, तलवार, कोयता, लोखंडी गज, दगड, मिरचीपूड या हत्यारांचा वापर करून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप दत्तात्रय पानसरे यांनी फिर्यादीत केला आहे.

यात त्यांच्यासोबत महेश पानसरे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रमेश परदेशी, शिवाजी परदेशी, नारायण परदेशी, शुभम परदेशी, योगेश परदेशी, नामदेव परदेशी, विठ्ठल परदेशी, भगवान परदेशी, हरी परदेशी, जनाबाई परदेशी, वंदना परदेशी, लता परदेशी, गीता परदेशी, साधना परदेशी, परदेशी परदेशी, श्रेया परदेशी, सर्व राहणार घारगाव ( ता.श्रीगोंदे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान याच मारामारी दत्तात्रय पानसरे व त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना पानसरे, महेश पानसरे, सुनील पानसरे, किसन पानसरे, राधाबाई पानसरे यांनी गजाच्या साहाय्याने आपल्यावर हल्ला करुन जखमी केल्याची फिर्याद शुभम परदेशी यांनीही बेलवंडी पोलिसात दाखल केलेली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT