Prithviraj Chavhan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara India Aghadi : अखेर ठरलं! इंडिया आघाडीची साताऱ्यात बैठक; लोकसभेची रणनीती ठरणार

Loksabha Election 2024 : आघाडीतील घटक पक्ष व परिवर्तनवादी, पुरोगामी विचारांच्या संघटना यांच्या 60 विशेष प्रतिनिधींना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (ता. 6 मार्च) जिल्हा काँग्रेस भवनात होणार आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News : भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्ष व संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक साताऱ्यात होत आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष व परिवर्तनवादी, पुरोगामी विचारांच्या संघटना यांच्या 60 विशेष प्रतिनिधींना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (ता. 6 मार्च) जिल्हा काँग्रेस भवनात होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली आहे.

इंडिया आघाडीतील (INDIA Aghadi) घटक पक्ष व त्यासंदर्भात 56 संघटनांची बैठक साताऱ्यात होत आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

केंद्रातील भाजप (BJP) सरकारच्या द्वेषमूलक, भ्रष्ट कारभारामुळे भारतातील जनतेचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, जीवन उद्ध्वस्त झाले आहे. तसेच केंद्राच्या दडपशाही व गैरकारभारविरोधात पक्ष संघटना व आपण सर्व संघर्ष करीत आहोत. विविध स्तरातील या संघर्षाला देशपातळीवर इंडिया आघाडीच्या नावाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संघटित झाले आहे. या बैठकीत लोकसभेची जिल्ह्यातील सातारा (Satara) व माढा मतदारसंघातील रणनीती ठरवली जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या सातारा व माढा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले असून, महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन जिल्ह्यातील दोन खासदार निवडून आणण्याचे त्यांचे मनसुभे आहेत. पण, विरोधी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीने आतापर्यंत या दोन्ही मतदारसंघात एकत्रितपणे बैठक घेऊन कोणतीही बांधणी केली नव्हती. पण, आता या इंडिया आघाडीच्या पहिल्यांदाच होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपला रोखण्यासाठी नेमकी कोणतीही रणनीती ठरणार याची उत्सुकता आहे.

(Edited by Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT