लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या समन्वय बैठका सुरू आहेत. तरीही महायुतीमधील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अद्याप एकोप्याची भावना निर्माण झालेली नाही. त्यामुळे महायुतीतील मित्र पक्षांमध्ये वारंवार खटके उडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या बैठकीदरम्यान आपण लोकसभेच्या लग्नासाठी एकत्र आलो असल्याचा महत्त्वाचा मेसेज मित्रपक्षांना दिला. महायुतीची पुणे, बारामती, शिरूर या लोकसभा मतदारसंघाबाबतची आज पुण्यात बैठक झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहू लागलेत. आचासंहिता कधीही लागू होऊ शकते. त्या अनुषंगाने बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघांची बैठक झाली. या बैठकीला त्या त्या मतदारसंघातील सर्व नेते उपस्थित होते. एकदिलाने बैठक झाली हे खरं असले तरी कुटुंबातील एखादी गोष्ट खटकत असेल तर ते सांगण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) यांनी काही मत नोंदवले असेल तर वरिष्ठ पातळीवरती त्यांचे मत ऐकून निर्णय घेतला जाईल. याबाबत योग्य ती दखल वरिष्ठ पातळीवरची तिन्ही पक्षांचे नेते घेण्यास समर्थ आहेत.
काही गोष्टींबाबत मित्रपक्षांमध्ये मतभेद असले तरी ते आम्ही एकत्रित असून चर्चा करून सोडवू. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे याबाबत सर्वांचे एकमत आहे, असे चंद्रक्रांत पाटील यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वेगवेगळ्या कारणांनी एकत्र असलेली कुटुंब विभक्त होतात आणि घरातील एखाद्या लग्नासाठी एकत्र येतात. आणि लग्न पार पडल्यानंतर आपापल्या घरी निघून जातात. काही वेळेस त्या लग्नामध्ये आपण एकत्र राहुयात असाही निर्णय होतो. लोकसभा निवडणुका या महायुतीतील सर्व पक्षांसाठी एक लग्न समारंभ आहे, हे उदाहरण दिल्याचे चंद्रकांत पाटील यावेळी स्पष्ट केले. या निमित्ताने देशभरातून 400 जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महायुतीला बदनाम करायचे काम सुरू आहे. ज्यांना मराठा आरक्षण देता आला असते त्यांनी दिले नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना लगावला.
उध्दव ठाकरे यांचे आमदार त्याच्या नाकाखालून निघून गेले आहेत. त्यांना ते कळले देखील नाही. त्या उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) काय बोलू? ते आम्हाला लोकसभेला काय आव्हान देणार, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना टोला लगावला.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.