BJP leaders join BRS  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP leaders join BRS : भाजपच्या माजी नगरसेवकांचा बीआरएस मध्ये प्रवेश ; केसीआर यांचे सोलापुरकरांना मोठे आश्वासन..

BRS News : सोलापुरच्या विकासासाठी बीआरएसच्या प्रभावी पर्यायाचा विचार करावा,"

सरकारनामा ब्यूरो

Hyderabad News : हैदराबाद येथील भारत राष्ट्र समितीच्या मुख्यालयात पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप,भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्यासह संतोष भोसले,जुगून अंबेवाले आणि राजश्री चव्हाण या भाजपच्या माजी नगरसेवकांनी बीआरएसचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश केला. (Five BJP leaders join BRS)

याप्रसंगी केसीआर यांनी सोलापूर शहराचा विकास करु, असे आश्वासन दिले. यावेळी केसीआर यांनी आपण लवकरच सोलापूरात येणार असे जाहीर केले. "लाखोंच्या उपस्थितीत जुलै अखेर सोलापूरात भव्य सभा घेऊ, तेव्हा लोकांनी सोलापूरच्या विकासासाठी बीआरएसच्या प्रभावी पर्यायाचा विचार करावा," असेही ते म्हणाले.

केसीआर म्हणाले, "सोलापूर सारखे मोठे शहर विकासापासून वंचित आहे, येथे शिकलेल्या मुलांना रोजगारासाठी परगावी जावे लागते. हे विदारक चित्र दूर करण्यासाठी बीआरएसच्या हाती सत्ता द्या. आम्ही शहराचा विकास तर करूच शिवाय मोठे मोठे आयटी कंपन्याही आणू,"

"शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. लोकांना पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपला जनतेने संधी दिली, तरीदेखील या राज्याचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. अशीच परिस्थिती देशाच्या अन्य राज्यांची आहे. तेव्हा भारतात क्रांती,परिवर्तनाची गरज आहे,परिवर्तित भारतच समस्यांचे उच्चाटन करू शकतो. बीआरएस हा क्रांती आणणारा पक्ष आहे. बीआरएस पक्षाचा देशभरात विस्तार करून शेतकऱ्यांची सत्ता देशावर आणण्याचा आमचा संकल्प आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही देशाचा म्हणावा तसा विकास झाला नाही," असे केसीआर म्हणाले.

नागेश वल्याळ म्हणाले, "सोलापूरचा आजवर सत्ताधाऱ्यांनी विकास केला नाही. त्यामुळे आता तेलंगणा पॅटर्नची सोलापूरला नितांत गरज आहे. सोलापूरचा विकास करण्याच्या उद्देशाने मी व गोप यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. उच्च शिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई,बेंगळुरू,हैदराबादला जातात. त्यांच्यासाठी सोलापुरात आयटी कंपनी आणणे बीआरएसकडून अपेक्षित आहे,"

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT