Maharashtra Cabinet Expansion  news update
Maharashtra Cabinet Expansion news updateSarkarnama

Maharashtra Cabinet Expansion : नगर जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात संधी ; जगतापांनी घेतली अजितदादांची भेट..

Maharashtra Politics : जगताप कुटुंबाचा एक राजकीय दबदबा पक्षात आहे.
Published on

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह नऊ आमदार मंत्री झाले आहे. यामुळे आता राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्यास सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर नगरचे राजकारणही ढवळून निघाले आहे. सहा पैकी आमदार निलेश लंके आणि आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवार गटाची वाट धरली आहे.

नगर शहराचे पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या सोबतच जाणे पसंत केले आहे. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांत आणि अजित पवार यांच्यात समनव्य ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडल्याची मोठी चर्चा आहे.

त्यातच काल (शनिवारी) संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांनीही मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ही संधी संग्राम जगताप यांना मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

Maharashtra Cabinet Expansion  news update
Eknath Shinde : नाराज आमदारांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय ; शिंदे गटाच्या प्रत्येक मंत्र्यांवर..

मुंबई येथे अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी अरुण जगताप यांनी भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर उपस्थित होते. अरुण जगताप राष्ट्रवादी काँग्रेस कडून दोन वेळा विधानपरिषदेत निवडून गेलेले आहेत.

तर त्यांचे पुत्र संग्राम जगताप यांनीही 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळी मोदी लाट असताना नगर शहरातून राष्ट्रवादी कडून विजय मिळवला आहे. साहजिकच जगताप कुटुंबाचा एक राजकीय दबदबा पक्षात आहे.

संग्राम जगताप यांना 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभेला मैदानात उतरवले होते. मात्र त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतर त्यांनी विधानसभा आरामात जिंकली.

Maharashtra Cabinet Expansion  news update
Thackeray group warning to Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांना ठाकरे गटाचा इशारा ; 'सांभाळून रहा'...

त्यांचे खासदार सुजय विखे यांच्या सोबत चांगले संबंध असून आता तर अजित पवार गट शिंदे-फडणवीस यांच्या सोबत सत्तेत असल्याने आमदार जगताप यांना 2024 ची विधानसभा निवडणूक अजून सोपी झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सत्ताकाळात पक्षाच्या कुणान कुणाला लोकप्रतिनिधीला प्रत्येक मंत्रिमंडळात हमखास संधी मिळाली आहे. यात मधुकर पिचड, बबनराव पाचपुते यांना सातत्याने संधी मिळाली. 2014 नंतर पिचड,पाचपुते भाजपात गेल्याने 2019 ला आघाडी सरकारमध्ये प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्रीपद होते.

Maharashtra Cabinet Expansion  news update
Sharad Pawar In Nashik : येवल्याच्या सभेपूर्वी शरद पवार, म्हणाले, "बंडखोरांबाबतचा अंदाज चुकला, हा माझा दोष...

आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने बारा विधानसभा मतदारसंघ असलेल्या आणि त्यात 2019 ला सहा विधानसभा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत आपल्या गटाकडे ठेवण्यासाठी नगर जिल्ह्याला किमान एखादे राज्यमंत्री पद द्यावे लागेल असे बोलले जाते.

आमदार निलेश लंके हेही अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यात संग्राम जगताप यांना दोन वेळेसचा विधानसभेचा अनुभव असल्याने आणि जगताप कुटुंबाचे नातेसंबंध भाजपचे माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांच्याशी असल्याने 2024 चा विचार करता संग्राम जगताप यांना मंत्रिमंडळ विस्तारात अधिक संधी असल्याचे बोलले जाते. अरुण जगताप यांची या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या शुभेच्छा भेटीकडे त्यादृष्टीने पाहिले जात आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com