अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यां मागील कोरोनाचे शुक्लकाष्ट अजूनही संपताना दिसत नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ), ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) व भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्या नंतर आता नगर शहरातील आणखी एका मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. Following Radhakrishna Vikhe Patil, Dr. Sujay Vikhe is a corona positive
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती स्वतःलाच सोशल मीडियावर दिली आहे. खासदार विखे पाटील यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
खासदार विखे पाटील यांच्या वडिलांना म्हणजेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना या आधीच कोरोना आला आहे. दोन्ही पिता-पुत्रांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या विवाह समारंभात हजेरी लावली होती याशिवाय खासदार विखे पाटील यांनी विळद घाट येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.
विखे पाटील पिता-पुत्रांचा जनसंपर्क जिल्ह्यात सर्वात मोठा समजला जातो. त्यामुळेच संपर्कात आलेल्या व्यक्तींना त्यांनी दक्षता घेणे असे आवाहन केलेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.