Sandipan Thorat  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sandipan Thorat Passed Away : पंढरपुरातून सात वेळा लोकसभेवर निवडून आलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात यांचे निधन

संदीपान थोरात यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : काँग्रेस (Congress) पक्षाचे माजी खासदार संदीपान थोरात यांचे उपचारादरम्यान सोलापुरात निधन झाले. थोरात हे पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल सात वेळा निवडून आले होते. थोरात यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सखुबाई थोरात, चार मुलगे आणि तीन मुली असा परिवार आहे. (Former Congress MP Sandipan Thorat passed away)

संदीपान थोरात यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही ११ मार्च रोजी सोलापुरातील खासगी रुग्णालयात रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची अस्थेवाईकपणे चर्चा केली होती.

संदीपान थोरात हे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून सात वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. माजी खासदार संदिपान थोरात हे 1977 ते 1999 या कालावधीत पंढरपूरचे सलग सात वेळा खासदार होते. गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ म्हणून थोरात प्रचलित होते. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख होती.

पंढरपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनविण्यात थोरातांचा स्वभाव आणि त्यांचे राजकारण महत्वाचे मानले जाते. पंढरपुरात सात वेळा निवडून आलेले संदीपान थोरात हे शेवटपर्यंत गांधी परिवाराशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेससोबत असलेल्या रामदास आठवले यांच्यासाठी १९९९ मध्ये थोरात यांना हा मतदारसंघ सोडावा लागला. पण १९७७ ते १९९९ पर्यंत थोरात यांनी हा बालेकिल्ला राखला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT