BJP News : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात युडियुरप्पांचा मुलगा उतरणार मैदानात : माजी मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

येडियुरप्पा यांच्या या संकेतामुळे कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीतील सर्वांत मोठी लढत वरुणा मतदारसंघात पहायला मिळू शकते.
BS Yudiyurappa-Siddaramaiah-vijendra
BS Yudiyurappa-Siddaramaiah-vijendra Sarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच कर्नाटकात (Karnataka) राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, भाजपच्या उमेदवारांचीही चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे दिग्गज नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या मुलाच्या उमेदवारीबाबत मोठे भाष्य केले आहे. म्हैसूरमधील वरुणा मतदारसंघातून काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात मुलगा विजयेंद्र याला निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याचे संकेत येडियुरप्पा यांनी दिले आहेत. (Yudiyurappa's son will contest against former Chief Minister Siddaramaiah)

येडियुरप्पा यांच्या या संकेतामुळे कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीतील सर्वांत मोठी लढत वरुणा मतदारसंघात पहायला मिळू शकते. मात्र, येडियुरप्पांच्या या विधानामुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील लिंगायत मतदारांमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या उद्देशाने भाजपने ही खेळी केल्याचे मानले जात आहे.

BS Yudiyurappa-Siddaramaiah-vijendra
Jayshree Palande News : आक्रमक महिला नेत्या जयश्री पलांडे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार : येत्या बुधवारी करणार भाजप प्रवेश

बी.एस. येडियुरप्पा हे गुरुवारी माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना त्यांचा मुलगा विजयेंद्र यांना वरुणा मतदारसंघातून उमेदवारी देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ही शक्यता नाकारली नाही. ते म्हणाले की, 'चर्चा सुरू आहे, ते केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयावर अवलंबून आहे. पण, आम्ही तगडा उमेदवार निवडून (काँग्रेसला) कडवी लढत देऊ. बघूया काय होते ते.’

BS Yudiyurappa-Siddaramaiah-vijendra
Solapur NCP News : राष्ट्रवादी नेत्याच्या अंगावर ट्रक घालणारा चालक म्हणतो ‘तो मी नव्हे’च!

आगामी विधानसभा निवडणुका भाजप स्पष्ट बहुमताने जिंकेल. कर्नाटकात आम्हाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. काँग्रेस भ्रष्ट आहे; म्हणूनच ४० टक्के कमिशनचा खोटा आरोप करत आहे, त्यामुळे मतदारांना काही फरक पडणार नाही, असा दावाही येडियुरप्पा यांनी केला.

BS Yudiyurappa-Siddaramaiah-vijendra
Karnataka Election: भाजपने खेळला मोठा डाव; निवडणूक जाहीर होण्याच्या काही तास आधी काँग्रेस मुख्यमंत्र्यांबाबत घेतला हा निर्णय..

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपण यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. येडियुरप्पा यांनी वयाचा हवाला देत ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, 'मी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी वयाची ८० वर्षे ओलांडल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला होता. माझे वय ८० पेक्षा जास्त असले तरी मी यावेळीच नव्हे; तर पुढच्या वेळीही राज्याचा दौरा करणार आहे. यावेळीच नव्हे; तर पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com