Dilip kolhe
Dilip kolhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे मुख्यमंत्री शिंदे गटाच्या मार्गावर

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापुरात (Solapur) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणारे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे (Dilip Kolhe) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या मार्गावर आहेत. कोल्हे यांनी दोन वेळा आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) यांची भेट घेतली आहे. दरम्यान, दिवाळीनंतर कोल्हे बाळासोहबांची शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे माहिती शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांनी दिली आहे. (Former deputy mayor of Solapur NCP Dilip Kolhe on the path of Eknath Shinde group)

दिलीप कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. अनेक अडचणीच्या काळात ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत, त्यामुळे माजी महापौर कोल्हे यांच्या राष्ट्रवादी सोडण्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ते माजी उममुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे कोल्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे सोलापुरात राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना धक्का पोचू शकतो.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची काही दिवसांपूर्वी दिलीप कोल्हे यांनी भेट घेतली होती. त्या भेटीनंतर कोल्हे यांची शिंदे गटासोबत प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर दिलीप कोल्हे यांनी पुन्हा दुसऱ्यांदा आरोग्य मंत्री सावंत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे कोल्हे हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सोलापुरात रंगली आहे.

महेश कोठे आणि इतर नेत्यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्याचे स्वप्न पक्षाच्या नेत्यांकडून पाहिले जात आहे. मात्र, कोल्हे यांच्यासारख्या निष्ठावंतांनी पक्ष सोडल्यास नेतृत्वाच्या मनसुब्यांना धक्का पोचू शकतो. दरम्यान, सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप कोल्हे हे दिवाळीनंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT