Sangli Hindu Garjana Sabha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hindu Garjana Sabha : भाजपच्या माजी मंत्र्यांची मिरजला ‘मिनी पाकिस्तान’ची उपमा; हिंदू गर्जना सभेत वादग्रस्त वक्तव्य

Suresh Khade : मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली शहरात हिंदू गर्जना सभा पार पडली. यावेळी शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Aslam Shanedivan

Sangli News : राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज (ता. १०) वादग्रस्त विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी सांगली शहरात हिंदू गर्जना सभेत एका समाजाला लक्ष करताना, ईव्हीएम म्हणजे व्होट्स अग्नेस्ट मुल्ला असे म्हटले आहे. तसेच ज्याने भगवाधारी सरकार आणलं त्याचं संरक्षण आम्ही करणार असं म्हटलं आहे. या वक्तव्यामुळे आधीच राजकीय वातावरण गरम झालं असतानाच त्याच सभेत माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांनी मिरजची थेट मिनी पाकिस्तान म्हणून तुलना केली आहे. यामुळे आता आणखीन वातावरण तापण्याची शक्यता आहे.

खाडे हे मिरज मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झाले आहेत. मात्र यावेळी त्यांनी त्याच मतदार संघाची तुलना पाकिस्तानशी करत मतदारांचा अपमान केला आहे. खाडे यांनी मिरजसारख्या मिनी पाकिस्तानमधून आपण चार वेळी निवडून आलो आहोत. आपण जातीन चांभार म्हणजेच दलित आहे. मात्र हिंदू राष्ट्राच्या लढाईत मागे नसल्याचे म्हटले आहे.

याच सभेत आधी मंत्री राणे यांनी भडकाऊ विधान करत एका समाजाला लक्ष केले होते. तसेच त्यांनी विशाळगडावर कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ देणार नाही, असाही पवित्रा घेत एका समाजाला लक्ष केले. त्याच सभेत राणे यांच्याप्रमाणेच खाडे यांनी भडकाऊ भाषण केल्याने मिरजच्या नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या सभेत खाडे यांनी देशाला हिंदूराष्ट्राकडे नेण्याचा निर्धार बोलून दाखवला. यावेळी ते म्हणाले, मी जातीने चांभार असून दलित आहे. पण हिंदू राष्ट्र निर्मितीकडे जी केंद्राचे पावले पडत आहेत. त्याला आमची साथ आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. हिंदूराष्ट्र व्हावे अशी अनेकांनी इच्छा आहे तशीच आमची मागणी असल्याचे खाडे म्हणाले. यावेळी त्यांनी मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तान संभोधले.

विरोधक आता किरकोळ

यावेळी खाडे यांनी विरोधकांवर निशाना साधताना विधानसभा निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला आहे. ते आता किरकोळ झाले असून त्यांना विरोधी पक्षनेता देखील नसल्याचे म्हणत खिल्ली उडवली. तर विरोधकांना विधीमंडळात बोलायला देखील संधी मिळाली नाही. पण हिंदू समाजाने बंटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है चा नारा दिल्याने आपल्याला संधी मिळाल्याचे खाडे म्हणाले.

नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

यावेळी नितेश राणे यांनी देखील हिंदू राष्ट्राचा निर्धार करताना विरोधकांवर निशाना साधला. तर विरोधकांना ईव्हीएमचा अर्थ कळाला नसून ते बोंब मारत आहेत. पण ‘ईव्हीएमचा खरा अर्थ एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’असल्याचे वादद्रस्त वक्तव्य राणे यांनी केले. यानिमित्ताने नितेश राणे यांनी पुन्हा एकदा एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT