Karad News : लाडक्या बहिणीवरुन महायुतीत कोणताही वाद नाही. या योजनेबद्दलचे अजित पवारांचे बॅनर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लावले, ते अजितदादांनी लावले नाहीत. ही योजना महायुतीचीच आहे. त्याला मुख्यमंत्र्यांचे नाव दिले गेले, अजित पवार यांनी त्याला अर्थसहाय्य केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातुन ही योजना बाहेर पडली आहे.
मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नाकावर टिच्चून लाडकी बहीण योजना ही फडणवीसांचीच असल्याचे सांगितले आहे.यावरुन आता पुन्हा महायुतीतील श्रेयवाद पेटण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ही योजना तिघांची म्हणजेच महायुतीचीच असुन ती जनतेसाठीच आहे, असे स्पष्टीकरण कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. ही योजना बंद होणार नाही. विरोधक काहीतरी बोलुन फुसका बार काढत आहेत. हे विरोधक भुरटे आहेत. जनतेने यांच्यावर विश्वास ठेवु नये अशी माझी विनंती आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजप कामगार मोर्चा कऱ्हाड दक्षिणच्यावतीने शिंदेवाडी- विंग (जि.सातारा) येथील बांधकाम कामगार संमेलनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, भरत पाटील व मान्यवर उपस्थित होते. लाडकी बहीण योजनेचे अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो न लावता त्यांचेच फोटो लावले होते.
त्यामुळे त्या योजनेवरुन महायुतीत श्रेयवाद सुरु आहे का या प्रश्नावर मंत्री खाडे म्हणाले, बॅनर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लावले. ही योजना महायुतीचीच आहे. त्याला मुख्यमंत्र्यांचे नाव दिले गेले, अजित पवार यांनी त्याला अर्थसहाय्य केले आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या डोक्यातुन बाहेर पडलेली लाडकी बहीण योजना आहे. ही योजना महायुतीचीच योजना असून ती तिघांची आहे, जनतेसाठीच आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल शंका व्यक्त केली होती. त्याबद्दल मंत्री खाडे म्हणाले, ही योजना बंद होणार नाही. पहिल्यांदा 1 कोटी 40 लाखांचे अनुदान देवुन महिलांना तीन-तीन हजार रुपये दिले आहेत. अजूनही देणार आहोत. ही योजना बंद होणार नाही. विरोधकांना बोलायला काय जाते ? काहीतरी बोलुन फुसका बार काढायचा, लोकांचे गैरसमज करायचे असे सुरु असते. हे विरोधक भुरटे आहेत. जनतेने यांच्यावर विश्वास ठेवु नये अशी माझी विनंती आहे.
ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी नोदंणीकृती बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य संच पेटीचे वितरण केले जाते. तसेच पात्र लाभार्थींना भांडी, तसेच बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्याची योजना 2015 पासुन सुरु होती. त्यांच्या काळात ही योजना राबवली गेली नाही.
मी कामगार मंत्री झाल्यापासून ही योजना पुन्हा गतीने सुरु केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा यायचे कारण काय ? आम्हाला त्यांचा पक्ष आणि नेत्यांचे काय देणेघेणे नाही. गरीबाची सेवा आम्ही करत आहोत. आमची नाळ जनतेशी जोडली गेली आहे. त्यामुळे जनता आता काय तो निर्णय करेल. कामगार मंत्रालयाकडे मनुष्यबळ कमी होते. त्यामुळे योजना रेंगळात होत्या. आता आम्ही मनुष्यबळ घेतले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम सुरु ठेवले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कऱ्हाडला उद्योग आणण्यासाठी मी अतुल भोसले यांच्या माध्यमातुन प्रयत्नशील राहीन असे आश्वासन देऊन मंत्री खाडे म्हणाले, कऱ्हाडला जर सर्व सुविधा मिळत असतील, एमआयडीसी असेल तर उद्योग आणण्यासाठी मी अतुल भोसले यांच्या माध्यमातुन निश्चित प्रयत्न करेन.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.